महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाल्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर या सर्वांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो दूर करण्याच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग असलेली ऑक्सिजन एक्सप्रेस आज विशाखापट्टणमला पोहोचली आहे. आता काही दिवसांनी ही गाडी द्रवरूप ऑक्सिजनसह महाराष्ट्रात पोहोचेल
महाराष्ट्रात ऑक्सिजनची सातत्याने कमतरता भासत आहे. त्यावर उपाय म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे रेल्वेमार्फत ऑक्सिजन पुरवठा करण्याची विनंती केली होती. रेल्वेने त्यानंतर ऑक्सिजन एक्सप्रेसची सोय केली.
हे ही वाचा:
प्रायव्हसी पॉलिसी प्रकरण, दिल्ली उच्च न्यायालयाने फेसबूक आणि व्हॉट्सऍप्पची याचिका फेटाळली
मृतदेह चुकीच्या घरी पाठवला, बीकेसी कोविड सेंटरचा धक्कादायक प्रकार
२४ एप्रिलपासून तरुणांच्या लसीकरणाची नोंदणी सुरु
राज ठाकरेंनी पुन्हा लिहिले मोदींना पत्र
मुंबईच्या पनवेल जवळच्या कळंबोली यार्डातून या गाडीने प्रवासाला सुरूवात केली. सात क्रायोजेनिक टँकर घेऊन ही गाडी विशाखापट्टणमकडे निघाली. ती गाडी आज विशाखापट्टणम जवळच्या विझॅग येथील रेल्वे राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- विझॅग स्टील प्लांट (आरआयएनएल- व्हीएसपी) येथे पोहोचली आहे.
पुढच्या चोविस तासात या गाडीवरील सात क्रायोजेनिक टँकरमध्ये द्रवरूप ऑक्सिजन भरला जाईल आणि ही गाडी परतीचा प्रवास सुरू करेल. या संपूर्ण प्रवासासाठी रेल्वेने ग्रीन कॉरिडॉरची सोय केली आहे.
आरआयएनएलने सुमारे ४०० टन द्रवरूप वैद्यकिय ऑक्सिजनचा पुरवठा आंध्र प्रदेशातील विविध ठिकाणी यापूर्वीच केला आहे.
कोविडची परिस्थिती बिकट होत असल्याने अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अनेक कोविड रुग्ण अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांच्यासाठी प्राणवायूचा पुरवठा आवश्यक ठरतो.