31 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषऑक्सिजन एक्सप्रेसने पोहोचवला २०,००० मॅट्रिक टनपेक्षा अधिक ऑक्सिजन

ऑक्सिजन एक्सप्रेसने पोहोचवला २०,००० मॅट्रिक टनपेक्षा अधिक ऑक्सिजन

Google News Follow

Related

कोविडच्या या महामारीत देशभरात द्रवरूप ऑक्सिजनची आयात निर्यात करण्यासाठी भारतीय रेल्वेने सुरु केलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेस रोज नव नवे विक्रम नोंदवत आहे. शनिवार, २९ मे रोजी या एक्सप्रेसने २०००० मॅट्रिक टनपेक्षा अधिक ऑक्सिजन देशभर पुरवण्याचा एक महत्वाचा टप्पा पार केला आहे.

सारा देश कोविड विरोधात लढाई लढत असताना, या लढाईत ऑक्सिजनचे खूप जास्त महत्त्व जाणवत आहे. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत असून अन्य राज्यातून ऑक्सिजनची ने आण सुरू आहे. ऑक्सिजनचा पुरवठा जलद गतीने आणि विना अडथळा व्हावा यासाठी भारतीय रेल्वेकडून ऑक्सीजन एक्सप्रेस ही अभिनव कल्पना सुरू करण्यात आली. ३४ दिवसांपूर्वी म्हणजेच २४ एप्रिल पासून या ऑक्सिजन एक्सप्रेसचा प्रवास सुरू झाला. आत्तापर्यंत एकूण ३०५ ऑक्सिजन एक्सप्रेस ने आपला प्रवास पूर्ण केला आहे. आत्तापर्यंत या एक्सप्रेसच्या माध्यमातून १२३७ पेक्षा आधी टँकर्सच्या माध्यमातून २०,७७० मॅट्रिक टन द्रवरूप प्राणवायू देशभर पोहोचवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

दहावी मूल्यांकन पद्धतीबाबत शाळा, पालक संभ्रमातच

ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध

बनावट ओळखपत्राच्या आधारे अभिनेत्रीचे लसीकरण

कोविडमुळे निराधार झालेल्या मुलांसाठी सरसावले मोदी सरकार

आत्तापर्यंत देशातील १५ राज्यांतील ३९ स्थानकांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेसने प्रवास केला आहे. यात उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र,मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे.

सध्या भारतीय रेल्वेतर्फे ऑक्सिजन एक्सप्रेसला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. भारतीय रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी विविध मार्ग निश्चित केले आहेत आणि कोणत्याही राज्याला आवश्यकता भासल्यास त्या राज्यात ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी स्वतःला सज्ज ठेवले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा