ऑक्सीजन एक्सप्रेसने पोहोचवला १५ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन

ऑक्सीजन एक्सप्रेसने पोहोचवला १५ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन

भारतीय रेल्वेने क्रांतिकारक पाऊल टाकत सुरू केलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेस उपक्रमाला भरपूर यश येताना दिसत आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसने आत्तापर्यंत ऑक्सीजन पुरवठ्याच्या बाबतीत पंधरा हजार मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठ्याचा टप्पा ओलांडला आहे. देशभरातील विविध अशा चौदा राज्यांमध्ये द्रवरुप मेडिकल ऑक्सिजन हा ऑक्सीजन एक्सप्रेस द्वारे पुरवण्यात आला

आत्तापर्यंत देशभरात २३४ ऑक्सिजन एक्सप्रेसने आपला प्रवास पूर्ण केला आहे. या ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून ९३६ पेक्षा अधिक टँकरमधून १५२८४ मेट्रिक टन पेक्षा अधिक वैद्यकीय वापरासाठीचा द्रवरूप ऑक्सिजन वितरित करण्यात आला आहे. ऑक्सीजन एक्सप्रेसला रेल्वे प्रशासनाकडून भरपूर प्राधान्य दिले जात असून ऑक्सिजन एक्स्प्रेसचा प्रवास विना अडथळा व्हावा यासाठी रेल्वेकडून शक्य ते सारे प्रयत्न केले जात आहेत. या गाडीच्या प्रवासासाठी रेल्वे मार्ग खुला ठेवला जातो आणि उच्च सतर्कता ठेवली जाते. ऑक्सीजन एक्सप्रेसच्या माध्यमातून आजवर महाराष्ट्राला ६१४ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन वितरित करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘ठाकरे सरकारचा पॅकेज देण्यावर विश्वास नाही, घेण्यावर आहे’

अनिल परबांनी शेतजमिनीवर बांधले अनधिकृत रिसॉर्ट

अभाविप कार्यकर्त्याच्या घरावर तृणमूलच्या गुंडाचा हल्ला

एफकॉन्स कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

कोविडच्या महारमारीत सारा देश होरपळून निघत असताना आरोग्य व्यवस्थेवर चांगलाच ताण पडला आहे. रुग्णांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची अनेक राज्यात कमतरता भासत आहे. यासाठी देशातील विविध ठिकाणांहून जलद गतीने आणि सुलभतेने ऑक्सिजनची ने आण करण्यासाठी भारतीय रेल्वेने ऑक्सीजन एक्सप्रेस ही अभिनव कल्पना सुरू केली आणि त्याला चांगले यश मिळताना दिसत आहे.

Exit mobile version