…आणि पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल

…आणि पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल

देशातील ऑक्सिजनची गरज भरून काढण्यासाठी मोदी सरकारकडून सुरु करण्यात आलेली ऑक्सिजन एक्सप्रेस आज महाराष्ट्रात दाखल झाली. ट्रेनच्या माध्यमातून ऑक्सिजन वाहून नेण्याचा हा अभिनव प्रयोग यशस्वी झाला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंबंधीचे ट्विट करत ही खुशखबर देशाच्या जनतेसोबत शेअर केली. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून ऑक्सिजन मिळवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

देशभरातील कोरोना संसर्गाचा उंचावणारा आलेख पाहता ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू केली. त्यानंतर नवी मुंबईतील कळंबोली येथून ही ऑक्सिजन एक्स्प्रेस रिकामे क्रायोजेनिक टँकर घेऊन विशाखापट्टणमला गेले. तिथे हे टँकर भरून महाराष्ट्रात आणले गेले आहेत. ७-८ टँकर ऑक्सिजन घेऊन ही एक्सप्रेस महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागगपुर शहरात दाखल झाली. आता हे ऑक्सिजनचे टँकर विविध जिल्ह्यात जाऊन ऑक्सिजनचा पुरवठा करतील.

या ऑक्सिजन एक्सप्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे ही एक्सप्रेस ‘ग्रीन कॉरिडॉर’ होती. म्हणजेच सगळ्यात जास्त प्राधान्य असलेली रेल्वे. या रेल्वेला सुरवातीलाच दोन इंजिन होती. एक विजेवर चालणारे इंजिन आणि दुसरे त्याला बॅक अप साठी असणारे डिझेल इंजिन. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत ही गाडी थांबू नये याची पूर्ण खबरदारी रेल्वेतर्फे घेण्यात येते. केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक ऑक्सिजन एक्सप्रेसला ‘ग्रीन कॉरिडॉर’ स्टेटस देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा थेट जर्मनीहून

भारताने गाठला लसीकरणात महत्त्वाचा टप्पा

पंतप्रधानांनी केजरीवालना खडसावले, शिष्टाचार मोडू नका!

हवाई मार्गाने ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक करण्यास केंद्राची परवानगी

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ह्या ऑक्सिजन एक्सप्रेससाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. भारत कोरोना महामारीचा सामना करताना सारे राष्ट्र एकसंध आहे असे फडणवीसांनी म्हटले आहे.

Exit mobile version