ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिकात

ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिकात

महाराष्ट्रात सध्या कोविडचा विस्फोट झालेला पहायला मिळत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात जाणवत आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातून चालवली गेलेली ऑक्सिजन एक्सप्रेस आता नाशिक पर्यंत आली आहे.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने रेल्वे मार्फत राज्याल ऑक्सिजन पुरवठा करण्याची कल्पना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना केली होती. त्यानंतर पनवेल जवळच्या कळंबोली यार्डातून या गाडीने प्रवासाला सुरूवात केली होती. या रेल्वेवर ७ क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर चढवण्यात आले होते.

हे ही वाचा:

…आणि पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल

देशातील ऑक्सिजन उत्पादकांशी मोदींचा संवाद

अनिल देशमुखांचे घर, कार्यालयासह, दहा ठिकाणी सीबीआयचे छापे

विरार दुर्घटनेत हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल

कळंबोली येथून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस दुसऱ्या रात्री विशाखापट्टणम येथील विझॅग स्टील प्लँटयेथे पोहोचली. तिथे सुमारे चोविस तास थांबून या टँकर मध्ये द्रवरूप वैद्यकिय ऑक्सिजन भरण्यात आला. त्यानंतर रात्री या गाडीने महाराष्ट्राकडील आपला प्रवास सुरू केला होता.

काल रात्री ही गाडी नागपूरला दाखल झाली. आज सकाळी ही गाडी नाशिकमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या बाबत खुद्द रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट केले होते.

राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने निरनिराळ्या मार्गांनी प्राणवायू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान ऑक्सिजन सोबतच व्हेंटिलेटरचा देखील तुटवडा भासत असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतू व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशातून महाराष्ट्राला सुमारे ३०० व्हेंटिलेटर मिळण्याची सोय करून दिली आहे.

Exit mobile version