विशाखापट्टणमहून महाराष्ट्राकडे निघाली ऑक्सिजन एक्स्प्रेस

विशाखापट्टणमहून महाराष्ट्राकडे निघाली ऑक्सिजन एक्स्प्रेस

ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता विविध राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. ही ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणमला दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या दिशेने निघाल्याचे कळते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा जीव भांड्यात पडला आहे. आता लवकरच महाराष्ट्रातील करोना रुग्णांना या ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकेल. द्रवरूपातील हा ऑक्सिजन टँकरद्वारे आणला जाणार आहे.

हेही वाचा:

रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला सर्वाधिक कोटा, पण ठाकरे सरकारचे रडगाणे सुरूच!

फायझरची लस भारतात ‘ना नफा’ तत्वावर मिळणार

२४ एप्रिलपासून तरुणांच्या लसीकरणाची नोंदणी सुरु

ऑक्सिजनच्या पुरवठ्याची गरज लक्षात घेता केंद्र सरकारने औद्योगिक ऑक्सिजनचे उत्पादन कमी करून वैद्यकीय ऑक्सिजनच्या उत्पादनाला प्राधान्य दिले. त्यानुसार जमशेदपूर, रुरकेला, बोकारो, विशाखापट्टणम इथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. हा ऑक्सिजन ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणण्यास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी कळंबोली, नवी मुंबईतून ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणमला निघाली. आता ही एक्स्प्रेस तिथे ऑक्सिजनचे टँकर घेऊन महाराष्ट्राच्या दिशेने निघाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या ट्रेनचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

या ऑक्सिजन एक्स्प्रेसवर क्रायोजेनिक ऑक्सिजन टॅंकर चढविण्यात आले आहेत. ते रिकामे टँकर तिथे भरले जातील आणि ऑक्सिजन एक्स्प्रेसवरून महाराष्ट्रात दाखल होतील. त्यासाठी कळंबोलीत खास रॅम्प तयार करण्यात आले होते. या रॅम्पवरून टँकर एक्स्प्रेसवर चढविण्यात आले.

Exit mobile version