25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहोचली

ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहोचली

Google News Follow

Related

राज्यात झालेल्या कोरोना विस्फोटामुळे राज्यत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. तो दूर करण्याचा प्रयत्न ऑक्सिजन एक्सप्रेस द्वारे केला जात आहे. ही गाडी आता ऑक्सिजनसह कळंबोली, नवी मुंबईत दाखल झाली आहे. या गाडीतून ४४ टन द्रवरूप ऑक्सिजन आणण्यात आला आहे.

राजकोटच्या हापा येथून महाराष्ट्राकडे निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस आता नवी मुंबईत दाखल झाली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. या गाडीने काल रात्री गुजरातच्या हापा येथून आपल्या प्रवासाला सुरूवात केली होती.

हे ही वाचा:

अमेरिकेतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची देखील मदत

कांगावाखोरांनी रोज सकाळी कांगावा करणं बंद करावं

पारल्यात नवे कोरोना केंद्र

युएईमध्ये झळकला तिरंगा

महाराष्ट्राला करोनाच्या वाढत्या संसर्गात आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी विविध स्तरातून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून हे तीन टँकर कळंबोली, नवी मुंबईत दाखल झाले आहेत. हे तीन टँकर रिलायन्स उद्योगातून पाठवले गेले. जामनगर, गुजरातमधून हे टँकर रविवारी निघाले. आज (सोमवारी) ते नवी मुंबईत, कळंबोली येथे पोहोचले. गुजरातपासून सुमारे ८६० किमी अंतर कापून ही एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या तिन्ही टँकरचे वजन अंदाजे ४४ टन (४४०६० किग्रॅ) इतके असेल.

या बरोबरच चौथी ऑक्सिजन एक्स्प्रेस लखनौवरून रविवारीच निघाली आहे. पुढील काही दिवस रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार या ऑक्सिजन एक्स्प्रेस ऑक्सिजनचा पुरवठा विविध ठिकाणी करणार आहेत.

विशाखापट्टणम येथून पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात आली होती. त्यातून सात ऑक्सिजनचे टँकर आणण्यात आले. प्रथम नागपूर नंतर नाशिकला हे टँकर पोहोचले.

ही गाडी पोहोचल्यानंतर नवी मुंबईतील रुग्णांना काही काळासाठी ऑक्सिजन बाबत तात्पुरता दिलासा मिळणार आहे. त्याबरोबरच केंद्र सरकारने राज्यांतर्गत ऑक्सिजन निर्मीती वाढवण्याचे प्रयत्न करावेत असा सल्ला देखील दिला होता. त्यामुळे ठाकरे सरकारदेखील राज्यातच ऑक्सिजन निर्मितीचा प्रयत्न सुरूवात करण्याच ठरवले आहे. या बरोबरच भारताल अमेरिकेतून देखील मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा केला जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा