कोविड महामारीत देशभर ऑक्सीजन पुरवण्यासाठी भारतीय रेल्वे तर्फे सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसचा प्रवास सुसाट वेगाने सुरु आहे. आतापर्यंत देशातील १५ राज्यातील, ३९ शहरांमध्ये, ४१ स्थानकांपर्यंत ही एक्सप्रेस पोहोचली आहे. तर १९४०८ मेट्रिक टन पेक्षाही जास्त द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन या ट्रेनने देशभर पुरवला आहे.
सारा देश कोविड विरोधात लढाई लढत असताना, या लढाईत ऑक्सिजनचे खूप जास्त महत्त्व जाणवत आहे. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत असून अन्य राज्यातून ऑक्सिजनची ने आण सुरू आहे. ऑक्सिजनचा पुरवठा जलद गतीने आणि विना अडथळा व्हावा यासाठी भारतीय रेल्वेकडून ऑक्सीजन एक्सप्रेस ही अभिनव कल्पना सुरू करण्यात आली. ३४ दिवसांपूर्वी म्हणजेच २४ एप्रिल पासून या ऑक्सिजन एक्सप्रेसचा प्रवास सुरू झाला. आत्तापर्यंत एकूण २८९ ऑक्सिजन एक्सप्रेस ने आपला प्रवास पूर्ण केला आहे.
हे ही वाचा:
अखेर जालन्यातील ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन
पश्चिम बंगालच्या मदतीसाठी धावलेल्या पंतप्रधानांचा ममता दीदींकडून अपमान
बॉलीवूडला पडली वीर सावरकरांची भुरळ, लवकरच येणार बायोपिक
पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांची बदली
महारष्ट्रात ६१४ मेट्रीक टन ऑक्सिजन पोहोचविण्यात आला असून सुमारे ३७३१ मेट्रिक टन उत्तर प्रदेशात, मध्य प्रदेशात ६५६ मेट्रीक टन, दिल्लीत ५१८५ मेट्रीक टन, हरयाणात १९६७ मेट्रीक टन, राजस्थानमध्ये ९८ मेट्रिक टन, कर्नाटकात १७७३ मेट्रीक टन, उत्तराखंडमध्ये ३२० मेट्रीक टन, १५५४ मेट्रीक टन तामिळनाडूमध्ये, आंध्रप्रदेशमध्ये १२६८ मेट्रिक टन, पंजाबमध्ये २२५ मेट्रीक टन, केरळमध्ये ३८० मेट्रीक टन, १४३२ मेट्रीक टन तेलंगणामध्ये, झारखंडमध्ये ३८ मेट्रीक टन आणि आसाममध्ये १६० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला.
सध्या भारतीय रेल्वेतर्फे ऑक्सिजन एक्सप्रेसला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. भारतीय रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी विविध मार्ग निश्चित केले आहेत आणि कोणत्याही राज्याला आवश्यकता भासल्यास त्या राज्यात ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी स्वतःला सज्ज ठेवले आहे.