ऑक्सिजन एक्सप्रेसची तीस हजारी कामगिरी

ऑक्सिजन एक्सप्रेसची तीस हजारी कामगिरी

भारत सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेस या अभिनव उपक्रमाची यशस्वी घोडदौड सुरु आहे. आत्तापर्यंत या एक्सप्रेसच्या माध्यमातून ३०००० मॅट्रिक टन पेक्षा अधिक द्रवरूप ऑक्सिजन वितरित करण्यात आला आहे. कोविड महामारीत देशभर भासत असलेली वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची गरज अल्पावधीत पूर्ण व्हावी यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस हा उपाय प्रशासनाने शोधून काढला. सर्व अडथळ्यांवर मात करत, भारतीय रेल्वेद्वारे द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) देशभरातील विविध राज्यात पोहोचवत त्यांना दिलासा दिला आहे.

आतापर्यंत या एक्सप्रेसने जवळपास ३०१८२ मेट्रिक टन द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन देशभरातील विविध अशा १५ राज्यांमध्ये पोहोचवेळा आहे. यापैकी ६१४ मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्रात वितरित करण्यात आला आहे. यासाठी १७३४ पेक्षा अधिक टँकरचा वापर करण्यात आला आहे. या टँकर्समध्ये भरूनच हा ऑक्सिजन देशभर पोहोचवला गेला आहे. तर आतापर्यंत ४२१ ऑक्सिजन एक्सप्रेसेसनी आपला प्रवास पूर्ण केला आहे आणि विविध राज्यांना दिलासा दिला आहे.

ऑक्सिजन एक्स्प्रेसने, महाराष्ट्रात ५० दिवसांपूर्वी, म्हणजेच २४ एप्रिल रोजी १२६ मेट्रिक टन ऑक्सिजन पोहोचवत वितरणाला आरंभ केला. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ६१४ मे.टन ऑक्सिजन वितरीत करण्यात आला आहे. आतापर्यंत देशात १५ राज्यांमधील सुमारे ३९ शहरांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन पोहोचवण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि सोलापूरसह अन्य शहरांचाही समावेश आहे.

ऑक्सिजन एक्सप्रेसचे महत्व लक्ष्यात घेता भारत सरकारतर्फे या रेल्वेला प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे ही रेल्वे विना अडथळा युद्धपातळीवर ऑक्सिजन पोहोचवण्याची सेवा देऊ शकते.

Exit mobile version