ऑक्सिजन एक्सप्रेसने पोहोचवला २५००० मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सिजन

ऑक्सिजन एक्सप्रेसने पोहोचवला २५००० मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सिजन

भारतीय रेल्वेने क्रांतिकारक पाऊल टाकत सुरू केलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेस उपक्रमाला भरपूर यश येताना दिसत आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसने आत्तापर्यंत ऑक्सीजन पुरवठ्याच्या बाबतीत पंचवीस हजार मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठ्याचा टप्पा ओलांडला आहे. देशभरातील विविध अशा पंधरा राज्यांमध्ये द्रवरुप मेडिकल ऑक्सिजन हा ऑक्सीजन एक्सप्रेस द्वारे पुरवण्यात आला आहे.

ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी देशसेवेसाठी वैद्यकीय वापरासाठीच्या २५००० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचे वितरण करून महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत, भारतीय रेल्वेने देशभरातील विविध राज्यांना १५०३ टँकर्सच्या वाहतुकीतून वैद्यकीय वापरासाठीच्या २५,६२९ मेट्रिक टनांहून अधिक द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.

हे ही वाचा:

एक कोटी वॅक्सीन टेंडरची सगळी कागदपत्रे जनतेसमोर आणा

पालिकेच्या ट्विटर अकाऊंटसाठी कोटींची उधळण

सलग आठव्या महिन्यात जीएसटी महसूल १ लाख कोटींच्या पार

महिलांना पुन्हा एकदा लोकल प्रवासाची मुभा

आतापर्यंत देशात ३६८ ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी आपला प्रवास पूर्ण केला आहे आणि विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवून दिलासा दिला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. आजपासून ४२ दिवसांपूर्वी, सर्वप्रथम २४ एप्रिलला महाराष्ट्रासाठी १२६ मेट्रिक टन ऑक्सिजन वाहून आणण्यापासून ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांनी त्यांच्या ऑक्सिजन वितरण कार्याची सुरुवात केली ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

देशातील उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाम या १५ राज्यांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांच्या माध्यमातून द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे या राज्यांना दिलासा मिळाला आहे. या १५ राज्यांमध्ये ३९ शहरे आणि नगरांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांनी द्रवरूप ऑक्सिजन पुरवठा केला आहे.

Exit mobile version