28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषदुकानं, हॉटेल्सवर मालकाचे नाव हवेचं; सीसीटीव्हीही बंधनकारक

दुकानं, हॉटेल्सवर मालकाचे नाव हवेचं; सीसीटीव्हीही बंधनकारक

भेसळ रोखण्यासाठी योगी सरकारचे निर्देश

Google News Follow

Related

अन्नपदार्थांमध्ये होत असलेल्या भेसळीच्या घटना लक्षात घेता उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यभरात निर्देश दिले आहेत. यानुसार उत्तर प्रदेशातील सर्व खाद्यपदार्थांची दुकाने, ढाबे, हॉटेल आणि रेस्टॉरंटवर मालक आणि व्यवस्थापकाचे नाव लिहिणे बंधनकारक असणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशाच्या विविध भागात घडणाऱ्या भेसळीच्या घटनांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. मंगळवार, २४ सप्टेंबर रोजी लखनऊमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व हॉटेल्स, ढाबा, रेस्टॉरंट इत्यादी संबंधित आस्थापनांची कसून चौकशी आणि पडताळणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. राज्यात यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेची काळजी घेत आवश्यकतेनुसार नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ज्यूस, डाळी आणि ब्रेड यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणे हे मान्य नाही, असे मुख्यमंत्री योगी यांनी स्पष्ट केले आहे. सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक असून केवळ ग्राहकांसाठी बसण्याची जागाच नाही तर आस्थापनातील इतर भागही सीसीटीव्हीने कव्हर केले पाहिजेत. प्रत्येक आस्थापना ऑपरेटर सीसीटीव्ही फीड सुरक्षित ठेवेल आणि आवश्यक असल्यास ते पोलीस, स्थानिक प्रशासनाला उपलब्ध करून देईल याची खात्री केली पाहिजे.

हे ही वाचा :

शरीर संबंधाला विरोध केल्याने ६ वर्षांच्या मुलीची हत्या

‘द लीजेंड ऑफ मौला जट’ पंजाब मध्ये प्रदर्शित होणार ?

लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात ४९२ ठार, हिजबुल्लाहने प्रत्युत्तरादाखल २०० रॉकेट डागले

आरोपीला भरचौकात फाशी द्या मागणी करणाऱ्यांची आपुलकी कशी वाढली?

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, आता ढाबा, रेस्टॉरंट इत्यादी खाण्याच्या आस्थापनांची सखोल तपासणी केली जाईल. प्रत्येक कर्मचाऱ्याची पोलीस पडताळणी केली जाईल. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारे खेळता येणार नाही. असे प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा