ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नुकतेच बाबरी मशिदीबाबत वक्तव्य केले होते.यानंतर त्यांच्यावर निशाणा साधत विश्व हिंदू परिषदेने(विहिंप) शनिवारी हैदराबादचे खासदार लवकरच “राम नाम”चा जप करणार असल्याचे म्हटले आहे.याआधी शनिवारी असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते की, बाबरी मशीद अत्यंत पद्धतशीरपणे मुस्लिमांकडून हिसकावण्यात आली होती.१९९२ मध्ये मशीद पाडली नसती तर मुस्लिमांना सध्याच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते, असे ते म्हणाले होते.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ओवेसींना उत्तर देताना विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, गेल्या ५०० वर्षात तुमचे कोणी पूर्वज अयोध्येत आले होते का?.ते पुढे म्हणाले की, ओवेसी हे ब्रिटनचे बॅरिस्टर आहेत.मशीद वाचवण्यासाठी त्यांनी नायालयात का धाव घेतली नाही? ते फक्त राजकारण करत आहेत, असे बन्सल म्हणाले. ते पुढे म्हणाले की, या मुस्लिम पक्षाने हे समजून घेतले पाहिजे की, ते लवकरच रामभक्त होतील आणि “राम नाम”चा जप करतील.
हे ही वाचा:
सुशांतसिंह राजपूत आज ३८ वर्षांचा असता;बहिणीने नव्या पुस्तकातून जागवल्या आठवणी!
लंडनच्या गल्ल्यांमध्ये ‘जय श्रीरामा’चा गजर!
११० किलो फळफुलांचा अभिषेक, ८१ कलश पाण्याने शुद्ध केले राममंदिर!
उद्धव ठाकरे यांना स्पीड पोस्टने निमंत्रण मिळाले!
कर्नाटकातील कलबुर्गी येथे राम मंदिराच्या अभिषेकापूर्वी पत्रकारांशी बोलताना ओवेसी म्हणाले , मुस्लिमांनी बाबरी मशिदीत ५०० वर्षे नमाज अदा केली.काँग्रेसचे जीबी पंत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री असताना मशिदीत मूर्ती ठेवल्या जात होत्या.त्यावेळी नायर हे अयोध्येचे कलेक्टर होते, ज्यांनी मशीद बंद करून तिथे पूजा सुरु केली.ते पुढे म्हणाले की. जेव्हा विहिंपची स्थापना झाली तेव्हा राम मंदिर अस्तित्वात न्हवते. महात्मा गांधींनी राममंदिराचा उल्लेख केला नसल्याचा दावाही त्यांनी केला.