भाजप आमदार विक्रम रंधावा यांनी शनिवारी बोलताना असदुद्दीन ओवैसी यांच्या आरएसएसवर दिलेल्या वक्तव्यावर आणि पाकिस्तान ट्रेन अपहरण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आरएसएसवर टीका केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. यावर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार विक्रम रंधावा म्हणाले की, “असदुद्दीन ओवैसी नेहमीच जातीय राजकारण करतात. त्यांचा उद्देश मुस्लिम कट्टरतेला प्रोत्साहन देण्याचा आहे, जे लाजिरवाणे आहे.”
शुक्रवारी संभळमध्ये घडलेल्या घटनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “शुक्रवारी लोकांनी वेळेवर जुमा नमाज अदा केला आणि होळीचाही सण साजरा केला. संभळमध्ये आपसी सामंजस्य पाहायला मिळाले. मात्र, ओवैसी यांना या गोष्टी खपत नाहीत. ते समाजात फूट पाडू इच्छितात.”
हेही वाचा..
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्याचे मिशन सुरू
गरिबांच्या जमिनीवरील अतिक्रमण काढून गुंडांना धडा शिकवा
चालू वर्षात रेल्वेची मालवाहतूक वाढून १,४६५ मेट्रिक टनवर
अरुणाचलमध्ये रस्ता दुरुस्ती दरम्यान वाहन दरीत कोसळले, कोल्हापुरातील जवान हुतात्मा!
पाकिस्तान ट्रेन अपहरण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विक्रम रंधावा म्हणाले, “पाकिस्तान हा जगभरात दहशतवाद पसरवणाऱ्या देशांपैकी एक आहे. मात्र, आता त्याच्याच कृत्यांचे परिणाम तो स्वतः भोगत आहे. पाकिस्तान आज स्वतःच दहशतवादाच्या विळख्यात अडकला आहे.”
एका अन्य प्रश्नाला उत्तर देताना भाजप नेते म्हणाले की, “असदुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्यांचा संपूर्ण देश निषेध करतो. जेव्हा तीन तलाक विधेयक मांडले गेले होते, तेव्हा त्यांनी मुस्लिम महिलांना या विरोधात भडकवले होते. मात्र, आता हा कायदा लागू झाल्यानंतर सर्वांना त्याचा फायदा होत आहे. मुस्लिम समुदायातील कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभाव होणार नाही.”