भेगा असल्या तरी गेटवे ऑफ इंडिया सुस्थितीत

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांचा दिलासा

भेगा असल्या तरी गेटवे ऑफ इंडिया सुस्थितीत

कोणीही मुंबईला गेले आणि त्यांनी गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली नाही असे होऊच शकत नाही. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले गेटवे ऑफ इंडियाला ११३ वर्षांपासून ते समुद्राच्या लाटा आणि वादळांना तोंड देत आजही मजबूत उभे आहे.

अलीकडेच गेटवे ऑफ इंडियाच्या प्रवेशद्वाराला भेगा पडल्याचे दिसून आले. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. परंतु केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या तपासणीदरम्यान पृष्ठभागावर काही भेगा पडल्याचे दिसून आले. परंतु गेटवे ऑफ इंडियाची एकंदरीत रचना चांगल्या स्थितीत असल्याचे मंत्री जी किशन रेड्डी यांनी लोकसभेत माहिती देताना म्हटले आहे.

गेटवे ऑफ इंडियाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये दर्शनी भागाला तडे गेल्याचे समोर आले असल्याबद्दल लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देतांना मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले की, गेटवे ऑफ इंडिया, मुंबई हे मध्यवर्ती संरक्षित स्मारक आहे. हे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाच्या संरक्षणाखाली आहे. तपासणी दरम्यान पृष्ठभागावर काही भेगा आढळल्या परंतु ते संवर्धनाच्यादृष्टीने चांगल्या स्थितीत आहे, असे ते म्हणाले.

गेटवे ऑफ इंडिया संदर्भात केंद्र सरकारला कोणताही अहवाल सादर केलेला नाही, असे उत्तर किशन रेड्डी यांनी दिले. पुरातत्व आणि संग्रहालय विभागाने विस्तृत स्थळ व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. गेटवे ऑफ इंडियाचे संवर्धन आणि दुरुस्तीसाठी ८,९८,२९,५७४ रुपये अंदाजित केले आहेत.”

ते म्हणाले, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला १० मार्च रोजी मान्यता देण्यात आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेट वे ऑफ इंडियाच्या दुरुस्तीसाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव मंजूर होताच दुरुस्तीचे काम सुरू होईल, असे आश्वासन दिले होते.

हे ही वाचा:

धोकादायक !! रेसिंगवर पैज लावत होते; ४२ बाईक आणि स्वार ताब्यात

अडीच वर्षांच्या कारभारावरून फडतूस कोण हे लोकांना ठाऊक आहे!

सरकार बदलले, साधू वाचले? पालघरच्या त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या…

मारहाणीचे राजकारण करण्यासाठी ठाण्यात सगळे ठाकरे एकवटले

नूतनीकरणासाठी ६.९ कोटी रुपयांचा प्रस्ताव

गेटवे ऑफ इंडियाचे स्ट्रक्चरल ऑडिट नुकतेच करण्यात आले. आणि ऑडिटनुसार, इमारतीच्या दर्शनी भागात भेगा दिसल्या. इमारतीवर अनेक ठिकाणी झाडेही उगवलेली दिसली. त्याचबरोबर घुमटातील वॉटरप्रूफिंग आणि सिमेंट काँक्रीटचेही नुकसान झाले आहे. त्यानंतर राज्याच्या पुरातत्व व स्थापत्य संचालनालयाने नूतनीकरणासाठी ६.९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.

Exit mobile version