‘आयुष्मान भव’ मोहिमेअंतर्गत अवघ्या चार दिवसांत पाच लाखांहून अधिक आयुष्मान भारत लाभार्थी कार्ड बनवण्यात आले आहे.आयुष्मान भव मोहिमेची सुरुवात १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते करण्यात आली.देशातील प्रत्येक गावात आणि शहरात आरोग्य सेवांचा लाभ मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
आयुष्मान भव मोहीम सुरू झाल्यापासून अवघ्या चार दिवसांत पाच लाखांहून अधिक आयुष्मान भारत लाभार्थी कार्ड बनवण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी गुरुवारी सांगितले.ते पुढे म्हणाले की, २० लाखांहून अधिक ABHA आयडी तयार केले गेले आहेत. तसेच मोफत उपचार आणि तपासणी सेवांचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत-आरोग्य कल्याण केंद्रे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांवर २० लाखांहून अधिक नोंदणी केली गेली आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १३ सप्टेंबर रोजी या योजनेचा शुभारंभ झाला असून योजनेचा मुख्य उद्देश देशातील प्रत्येक गावात आरोग्य विषयी संपूर्ण माहिती प्रदान करणे हा आहे.१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरू झालेल्या ‘सेवा पखवाडा’ (सेवा पंधरवड्या) दरम्यान याची अंमलबजावणी केली जात असून ती २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींचे परदेशात जाऊन भारतावर टीका करणे सुरूच..
इंडोनेशियाच्या शेल इको स्पर्धेत संघवी कॉलेजचे प्रतिनिधित्व करणार चिपळूणचा सुपुत्र
गॉडमदर लेडी डॉनला दरोड्याप्रकरणी मालाडमध्ये अटक
शरयू एक्स्प्रेसमध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणारा चकमकीत ठार !
आयुष्मान भव मोहिमेचे तीन घटक
आयुष्मान हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स (HWC) आणि कम्युनिटी हेल्थ क्लिनिक्स (CHC) प्रत्येक गावात स्थापन केले जाणार आहेत.गावातील ग्रामपंचायतीमध्ये आयुष्मान भव मोहिमेची माहिती सांगण्यासाठी सभा भरवण्यात येणार आहे.त्यामुळे तळागाळातील लोकांपर्यंत या योजनेची माहिती मिळाल्याने जास्तीत जास्त लोक या योजनेचा फायदा उचलून सहभागी होतील , त्यामुळे निरोगी राष्ट्राची निर्मिती सुनिश्चित होईल.
आयुष्मान आपल्या दारी ३.0 उपक्रमाद्वारे, सरकारचे उद्दिष्ट PM-JAY योजनेंतर्गत नावनोंदणी केलेल्या उर्वरित पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड उपलब्ध करून देण्याचे आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळतील याची खात्री होईल.HWCs आणि CHCs मधील आयुष्मान मेळाव्यामुळे ABHA IDs (आरोग्य आयडी) तयार करणे आणि आयुष्मान भारत कार्ड जारी करणे सुलभ होणार आहे.
आयुष्मान सभा अंतर्गत, गावातील पंचायतीमध्ये भरवण्यात आलेल्या सभेमध्ये आयुष्मान कार्डचे वितरण, ABHA आयडी तयार करणे तसेच असंसर्गजन्य रोग, क्षयरोग यांसारख्या महत्वाच्या आरोग्य योजना आणि रोग परिस्थितींबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम या सभेमधून करण्यात येणार आहे.तसेच सिकलसेल रोग, तसेच रक्तदान आणि अवयवदान याचीही माहिती योजनेतून नागरिकांना मिळणार आहे.आयुष्मान भव मोहिमेमध्ये ‘निरोगी गाव’ आणि ‘निरोगी ग्रामपंचायती’ निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.