गुजरातमध्ये दोन वेगवेगळ्या कारवाईत ४०० किलोहून अधिक ड्रग्ज जप्त!

४ जणांना अटक

गुजरातमध्ये दोन वेगवेगळ्या कारवाईत ४०० किलोहून अधिक ड्रग्ज जप्त!

गुजरात पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई करत तब्बल ४०० किलोहून अधिक ड्रग्ज जप्त केले आहे. एका कारवाईत २ किलोग्रॅम पेक्षा जास्त मेफेड्रोन आणि ४२७ किलोग्राम संशयित ड्रग्ज जप्त करण्यात आले,  असे अधिकाऱ्यांनी सोमवारी (२१ ऑक्टोबर) सांगितले.

सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंग गेहलोत यांनी सांगितले की, रविवारी (२० ऑक्टोबर) संध्याकाळी सुरतमधील वेलंजा गावाजवळ एका चारचाकीतून २ किलोग्रॅमपेक्षा जास्त एमडी जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या २ किलो एमडी ड्रग्जची किंमत २.१४ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : 

समाजवादी खासदार राम गोपाल यादव यांच्या शिवीगाळीवरून गोंधळ

फारुख अब्दुल्लांना उशीरा सुचले शहाणपण; पाकिस्तानला सुनावले!

उन्नावमध्ये मंदिर जिर्णोद्धाराला इस्लामी कट्टरतावाद्यांचा विरोध

सीमावाद निवळणार; प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या मुद्द्यावरून भारत- चीनमध्ये झाला करार

दुसऱ्या पथकाने रविवारी (२० ऑक्टोबर) रात्री अंकलेश्वर GIDC मधील अवसार एंटरप्राइज या युनिटवर कारवाई केली आणि संशयित औषधाची ४२७ किलोग्राम खेप जप्त केली. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. सुरत क्राईम ब्रँचने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जप्त करण्यात आलेले संशयित ड्रग्ज पुष्टीकरणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) कडे पाठवण्यात आले आहे.
Exit mobile version