पापुआ न्यू गिनीमधील भूस्खलनात तब्बल २००० हुन अधिक लोकांचा मृत्यू!

पापुआ न्यू गिनी राष्ट्रीय आपत्ती केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

पापुआ न्यू गिनीमधील भूस्खलनात तब्बल २००० हुन अधिक लोकांचा मृत्यू!

पापुआ न्यू गिनीमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेत तब्बल २००० हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.पापुआ न्यू गिनीमधील एंगा प्रांतातल्या यांबली गावात शुक्रवारी(२४ मे) मोठी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती.या दुर्घटनेत शेकडो घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत.या दुर्घटनेत सुरवातीला ६७० जण दगावल्याची सांगण्यात आले होते. मात्र, आता यामध्ये वाढ झाली असून तब्बल २००० हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.पापुआ न्यू गिनीच्या नॅशनल डिझास्टर केंद्राने संयुक्त राष्ट्रांना लिहिलेल्या पत्रात याची माहिती दिली.

सोमवारी(२७ मे) पापुआ न्यू गिनीच्या नॅशनल डिझास्टर सेंटरनं यूएनला लिहिलेल्या पत्रामध्ये मृतांची संख्या २००० च्या वर गेल्याचं नमूद केलं आहे.तसेच इमारती,शेती, बागांचे अतोनात नुकसान झाले असून देशाच्या आर्थिक जीवनरेषेवर मोठा परिणाम झाला आहे, असे राष्ट्रीय आपत्ती केंद्राच्या एका अधिकाऱ्याने संयुक्त राष्ट्रांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.दरड कोसळल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते.

हे ही वाचा:

रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी अथवा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार!

मुलींची बाजी, कोकण ‘गुणवत्ता यादीत’ अव्वल

अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीसाठी केजरीवालांची धावाधाव

दिवाळी पूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीचे फटाके?

दरम्यान, दरडीखाली दबलेल्या गावाची लोकसंख्या किती होंती याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.आतापर्यंत २००० हुन अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पापुआ न्यू गिनीची शेवटची जनगणना २००० साली पार पडली होती.त्यामुळे सरकारी आकडेवारीनुसार या गावाची सांगण्यात आलेली लोकसंख्या नंतरच्या काळात बरीच वाढली असल्याचे दावे केले जात आहेत.दरम्यान, पथकाला बचावकार्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे येत असून अजूनही बचाव कार्य सुरु आहे.

Exit mobile version