गेल्या ५० वर्षांत भारतामध्ये उष्माघातामुळे १७,०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

देशातील ९० टक्के भाग उष्माघाताचा प्रभावाखाली

गेल्या ५० वर्षांत भारतामध्ये उष्माघातामुळे १७,०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

मागच्या आठवड्यात नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. भारताच्या इतिहासातीलउष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंपैकी ही सर्वाधिक संख्या असल्याचे म्हटल्या जात आहे. त्याचवेळी गेल्या ५० वर्षांत भारतामध्ये उष्माघातामुळे १७,०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. १९७१ ते २०१९ या कालावधीत देशात उष्माघाताचा ७०६ घटना घडल्या असल्याचे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम राजीवन आणि इतर शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या २०२१ संशोधन अहवालात म्हटले आहे.

भारतात, सुमारे ७५ टक्के म्हणजे जवळपास ३ कोटी ८० लाख कामगार उष्णतेशी संबंधित तणाव अनुभवतात. हा क्रम असाच चालू राहिल्यास २०३० पर्यंत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात दरवर्षी २.५ ते ४.५ टक्के कमी होऊ शकतो अशी भीती मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

उष्णतेच्या बाबतीत १९०१ पासून नोंद ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून गेल्या वर्षातील फेब्रुवारी हा देशातील सर्वात जास्त उष्णता असलेला महिना ठरला तर मार्च हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण आणि १२१ वर्षांतील तिसरा कोरडा महिना होता. एप्रिल हा १९०१ नंतरचा तिसरा उष्ण महिना होता. हवामान खात्याने यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत देशातील बहुतांश भागांमध्ये सामान्य कमाल तापमानाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान बदलामुळे भारतात उष्माघात तीव्र होत असल्याचे एका नवीन अभ्यासातून दिसून आले आहे. देशातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त भाग उष्माघाताचा प्रभावाच्या ‘हाय अलर्ट’ किंवा ‘डेंजर झोन’मध्ये येत असल्याचं यात म्हटले आहे. केंब्रिज विद्यापीठात हा अभ्यास करण्यात आला आहे . दिल्ली उष्माघाताच्या गंभीर परिणामांसाठी असुरक्षित असल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे. संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने भारताच्या सुरु असलेल्या प्रयत्नांना उष्माघातामुळे पूर्वीपेक्षा जास्त अडथळा आंत असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.

हे ही वाचा:

आता ‘वॉटर मेट्रो’ने घ्या केरळच्या बॅक वॉटरचा आनंद

पंतप्रधानांना आत्मघाती बॉम्ब हल्ल्याचे धमकी पत्र लिहिणारा  पोलिसांच्या जाळ्यात

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला पहाटे भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

घरच्या मैदानात अजित पवारांनी केली मुख्यमंत्री पदाची दावेदारी…

भारताची हवामान असुरक्षा आणि शाश्वत विकास उद्दिष्टे प्रगतीवर हवामान बदलाचा संभाव्य परिणाम यांचे मूल्यांकन करण्यासाठी, संशोधकांनी हवामान असुरक्षा निर्देशांकासह देशाच्या उष्णता निर्देशांकाचे विश्लेषणात्मक मूल्यांकन केले. उष्णता निर्देशांक हे तापमान आणि आर्द्रता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन मानवी शरीराला किती उष्ण वाटते याचे मोजमाप आहे.

Exit mobile version