सिक्कीममध्ये भूस्खलन होऊन १२०० हून अधिक पर्यटक अडकले; नऊ जणांचा मृत्यू

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

सिक्कीममध्ये भूस्खलन होऊन १२०० हून अधिक पर्यटक अडकले; नऊ जणांचा मृत्यू

सिक्कीममध्ये झालेल्या पावसामुळे भूस्खलन होऊन पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात संततधार पावसाने झालेल्या भूस्खलनामुळे १५ परदेशी नागरिकांसह १२०० हून अधिक पर्यटक अडकले आहेत. तर, भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आहेत आणि घरे पाण्याखाली गेली आहेत, मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्याने विजेचे खांब वाहून गेले. सांगकलांगमध्ये नवीन बांधलेला पूल कोसळला, त्यामुळे मंगनचा झोंघू आणि चुंगथांगशी संपर्क तुटला. सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमधील कालिम्पाँग जिल्ह्यातील तीस्ता बाजाराजवळ तीस्ता नदीच्या काठावर असलेली अनेक घरेही पाण्याखाली गेली आहेत.जवळवास १२०० हून अधिक पर्यटक हे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकून पडले आहेत. सिक्कीम पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे प्रधान सचिव सी एस राव यांनी एका निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. मंगन जिल्ह्यातील लाचुंगमध्ये भारतातील तीन, बांगलादेशातील १० जण अडकले आहेत.

हे ही वाचा..

‘जी ७ शिखर परिषदेत सहभागी होऊन पंतप्रधान मोदी मायदेशी परतले’, ‘इटलीचे मानले आभार’!

आगीच्या अफवेवरून ट्रेनमधील प्रवाशांनी मारल्या उड्या, तिघांचा मृत्यू!

केजारीवालांचा न्यायालयातील व्हिडीओ पोस्ट प्रकरणी पत्नी सुनीता यांना नोटीस

छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाने ८ नक्षलवादी टिपले, एक जवान हुतात्मा!

मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी मिंटोकगुंग येथे एका उच्चस्तरीय बैठक घेतली. स्थानिक अधिकाऱ्यांनी अडकलेल्या पर्यटकांना आहेत त्याठिकाणी थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामानाच्या परिस्थितीनुसार सर्व पर्यटकांना हवाई मार्गाने आणण्यासाठी मुख्य सचिव कार्यालयाने केंद्राशी बोलणी सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. मंगनमधील जिल्हा प्रशासन, पोलीस आणि पर्यटन अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अडकलेल्या लोकांची सुटका करत आहे.

Exit mobile version