गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत. गेल्या २४तासांत नवीन कोरोना रुग्णांची संख्या ११ हजारांच्यावर गेली आहे. उपचार घेत असलेल्या अशा कोरोना बाधितांचा आकडाही ४९ हजारांच्या पुढे गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ११,१०९ नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४९,६२२ वर गेलेली आहे.
बुधवारी देशभरात कोरोनाचे १० हजार १५८ नवीन रुग्ण आढळले होते. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४४ हजार ९९८ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी ही आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, भारतात कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर ४.४२ टक्के आणि साप्ताहिक दर ४.०२ टक्के होता. सध्या देशात सक्रिय प्रकरणांची संख्या ०.१० टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.७१ टक्के आहे .
हे ही वाचा:
जेनेरिक आधार स्वस्त औषधांसाठी देशभरात १०,००० मेडिकल स्टोअर उघडणार
मास मीडियाचा कोर्स, पत्रकार, डान्स बार मग घरफोड्या
चिपचा तुटवडा संपला आणि मोटारींचा वाढला वेग.. विक्रीत दणदणीत वाढ
गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीवर युएपीए अंतर्गत कारवाई
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या सात दिवसांत देशात ४२ हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, संसर्गामुळे ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसापूर्वी म्हणजेच १३ एप्रिल रोजी समोर आलेल्या आकडेवारीत १,००० नवीन रुग्णांची भर पडली यावरून कोरोनाव्हायरस संसर्गाच्या वेगाचा अंदाज लावला जाऊ शकतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १३ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचे १०,१५८ नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच १२एप्रिल रोजी देशात एकूण ७,८३० रुग्ण आढळले होते.
कोरोनातून बरे होण्याच्या संख्येतही घट झाली आहे. यामुळेच कोरोनाचे सक्रिय रुग्णही सुमारे ४५ हजारांवर पोहोचले आहेत. मागील दिवसाच्या तुलनेत आज ४ हजारांहून अधिक प्रकरणे वाढली आहेत. आदल्या दिवशी सक्रिय प्रकरणे ४०,२१५ होती. कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होण्याची तीन कारणे असू शकतात, ज्यात कोरोना प्रोटोकॉलचे पालन न करणे, कमी चाचणी दर आणि व्हायरसचे नवीन प्रकार उद्भवणे या विविध कारणांमुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशनने व्यक्त केले आहे.