ओटीटीसाठी लागणार सरकारचा अंकुश?

ओटीटीसाठी लागणार सरकारचा अंकुश?

कोविड-१९ महामारीच्या काळात कोरोनापासूनच्या खबरदारीचा उपाय म्हणून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी ओटीटीचा पर्याय स्वीकारला. ओटीटीसाठी कोणतीही नियमावली नसल्यामुळे टीव्ही अथवा सिनेमागृहांत न दाखवला जाऊ शकणारा कंटेंट दाखवण्याचा यशस्वी व्यासपीठ ओटीटीच्या रुपाने पर्याय उपलब्ध झाला होता. मात्र वारंवार यावर प्रसिद्ध होणाऱ्या वादग्रस्त कंटेंटमुळे केंद्रीय माहिती व प्रसिद्धी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्लॅटफॉर्मवर लवकरच अंकुश लावला जाणार असल्याची माहिती दिली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम, डिस्ने प्लस हॉटस्टार इत्यादींचा समावेश होतो. यावर कोणताही अंकुश नसल्याने अनेक दृश्ये या प्लॅटफॉर्मवर दाखवता येतात. याचाच गैरफायदा घेत गेल्या काही काळात धार्मिक भावना दुखावणाऱ्या दृश्यांमुळे तांडव, सेक्रेड गेम्स, मिर्झापूर यासारख्या काही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. सातत्याने घडणाऱ्या या घटनांची नोंद घेत सरकारने नियमावली तयार करणार असल्याची घोषणा केली.

यापैकी तांडव आणि मिर्झापूर यांचा वाद ताजा आहे. तांडव या वेबसिरीज विरोधात देशात विविध ठिकाणी आंदोलने झाली. देशाच्या विविध भागातून वेबसिरीज विरोधात एफआयआर देखील दाखल झाल्या. देशातून मंत्रीमहोदयांना ओटीटीवर अंकुश लावण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्याला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म हे सेन्सॉर बोर्डच्या अंतर्गत येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी नवी नियमावली तयार करण्यात येणार आहे. 

Exit mobile version