एस. एस. राजमौली यांच्या आरआरआर या चित्रपटाने धमाल उडवून दिली होती. या चित्रपटातील नाटू नाटू या गीताला बेस्ट ओरिजिनल साँग म्हणून ऑस्करसाठी नॉमिनेशनही मिळाले होते. त्यामुळे हा चित्रपट चर्चेत होता.
आता चक्क सुप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी या चित्रपटाला पसंती दर्शविली आहे.
राजमौली आणि स्टीव्हन स्पीलबर्ग हे नुकतेच फोनच्या माध्यमातून एकमेकांशी बोलले तेव्हा त्यात चित्रपटांविषयी त्यांच्यात चर्चा झाली. रिलायन्स एन्टरटेनमेंटने याचे आयोजन केले होते. स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या द फॅबलमन्स यांच्या चित्रपटाचे प्रदर्शन भारतात १० फेब्रुवारीला रिलायन्सच्या वतीने करण्यात आले. त्यावेळी स्वाभाविकपणे RRR या चित्रपटाचा विषचही निघाला. तेव्हा स्पीलबर्ग म्हणाले की, तुमचा RRR हा चित्रपट अतिशय वेगळा आहे. माझ्या मनाला तो खूप भावला. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. हा चित्रपट पाहणे हा एक वेगळाच अनुभव होता. डोळ्यांना थक्क करणारे प्रसंग त्यात होते. तेव्हा RRRचे अभिनंदन.
हे ही वाचा:
पत्रकार वारिसे यांच्या हत्येची होणार एसआयटी मार्फत चौकशी
सीपीएल आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांतून ६२ हजार किलो कचरा केला गोळा
ठाण्यांत राष्ट्रवादीचे बारा वाजणार
मुंबईवरून ‘एक्सप्रेस वे’ने २४ नाही तर १२ तासांत गाठा दिल्ली
त्यावर राजमौली म्हणाले की, माझ्यासाठी तुमची ही प्रतिक्रिया विशेष अशीच होती. केवळ मी खुर्चीतून उठून नाचायचा बाकी होतो.
रामा (ज्युनियर एनटीआर), रामचरण, आलिया यांचा अभिनय मला आवडला. मला हे विचारायचे आहे की, तुम्ही चित्रपट कसा बनवला हे मला विचारायचे आहे आपण त्याविषयी कधीतरी नक्की बोलू, असेही स्पीलबर्ग या मुलाखतीदरम्यान बोलले. या मुलाखतीत द फॅबल्समॅन या स्पीलबर्ग यांच्या आत्मचरित्रात्मक चित्रपटाबद्दल चर्चा झाली.