सिनेसृष्टीतील मानाचा आणि प्रतिष्ठित समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहायमर’ चित्रपटाने बाजी मारली आहे.ओपेनहाइमर यंदाचा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे.तसेच ओपनहायनरने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात पाच पुरस्कार जिंकले आहेत.
यंदाच्या अकादमी अवॉर्डमध्ये ओपेनहाइमरची सत्ता पाहायला मिळाली.अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९६ अॅकेडमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहायमर’ अव्वल ठरला.ओपेनहाइमरला एकूण ७ अकादमी अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलं. सिनेमाला जवळपास १४ हून अधिक नामांकनं मिळाली होती.अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियरला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला. तसेच अभिनेता किलियन मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार होयते व्हॅन होयटेमा याला मिळाला. त्याशिवाय, बेस्ट एडिटींगचा पुरस्कार जेनिफिर लेन याला मिळाला.
हे ही वाचा..
‘नजीकच्या भविष्यात इस्रोची अध्यक्ष महिला होईल’
ऑस्ट्रेलियात भारतीय महिलेची हत्या, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला मृतदेह!
आचारसंहितेपूर्वी मंत्रालयात लगबग; पाच दिवसांत ७३० शासन निर्णय जारी
‘आयुष्मान’ योजनेचा ४८ टक्के महिलांकडून लाभ!
तसेच यंदाच्या अकादमी अवॉर्डमध्ये भारताचे दिवगंत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली. अकादमी अवॉर्डमध्ये “इन मेमोरिअम” मॉन्टेजमध्ये नितीन देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली.
९६व्या अकादमी अवॉर्डमधील विजेत्यांची यादी
बेस्ट एक्टर इन सपोर्टिंग रोल- रॉबर्ट डाउनी जूनियर को (ओपेनहाइमर)
बेस्ट एक्ट्रेस इन सपोर्टिंग रोल- दा’वाइन जॉय रैंडोल्फ को (द होल्डओवर्स)
बेस्ट एनिमेटेड फीचर फिल्म- द बॉय एंड हेरॉन
बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले- एनाटॉमी ऑफ ए फॉल
बेस्ट सिस्टोग्राफी- ओपेनहाइमर
बेस्ट कॉस्ट्यूम डिजाइन- पूअर थिंग
बेस्ट डॉक्यूमेंट्री फिचर फिल्म- २० डे इन मारियुपोल
बेस्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म- दि लास्ट रिपेयर शॉप
बेस्ट फिल्म ए़डिटिंग- ओपेनहाइमर
बेस्ट इंटरनेशनल फिचर फिल्म- द ज़ोन ऑफ इंटरेस्ट
बेस्ट मेकअप हेयरस्टाइलिंग- पूअर थिंग
बेस्ट प्रोडक्शन डिजाइन- पूअर थिंग
बेस्ट विजुअल इफेक्ट- गॉडजिला मइनस वन
बेस्ट साउंड- द ज़ोन ऑफ इंटरेस्ट
बेस्ट एनिमेटेड शॉर्ट फिल्म- वॉर इज ऑवर