लष्करी अधिकारी-जवानांमध्ये फूट पाडू नका!

राहुल गांधी यांच्या ‘वन रँक, वन पेन्शन’ टिप्पणीवर माजी हवाईदल प्रमुखांनी दिले उत्तर

लष्करी अधिकारी-जवानांमध्ये फूट पाडू नका!

भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया (निवृत्त) यांनी ‘वन रँक वन पेन्शन’ (ओआरओपी) विषयावरून अधिकारी आणि जवान यांच्यात फूट निर्माण करण्याच्या प्रयत्न करू नये, असा इशारा दिला आहे.

‘वन रँक वन पेन्शन’ योजनेंतर्गत अधिकाऱ्यांना अधिक फायदे मिळणार असल्याचे सांगत, त्याला राजकीय रंग देण्याचा अलीकडे सुरू असलेला प्रयत्न चिंताजनक असल्याचे एअर फोर्स असोसिएशनचे प्रमुख असणारे भदौरिया यांनी सांगितले.
नवी दिल्लीतील मेळाव्याला ते संबोधित करत होते. या मेळाव्यात भारतीय हवाई दलातील दिग्गज सहभागी झाले होते. त्या वेळी भदौरिया यांनी लष्कराशी संबंधित प्रकरणापासून राजकारणाला दूर ठेवण्याचे आवाहन केले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची टिप्पणी आली आहे. ‘सशस्त्र दलातील बहुसंख्य असलेल्या जवानांच्या तुलनेत अधिकारीवर्ग ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेतून जास्त आर्थिक लाभ घेत आहेत आणि जवनांना तुलनेने कमी रक्कम मिळते,’ असा आरोप या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी केला आहे.
या वक्तव्याचा समाचार भदौरिया यांनी घेतला. ‘आपण या वादापासून दूर राहायला हवे. या युक्तिवादाला अर्थ नाही. मला योजनेतील प्रत्येक विसंगतीची जाणीव आहे.

हे ही वाचा:

अहमदनगरमध्ये तिहेरी हत्याकांड; जावयाकडून पत्नी, मेव्हणा, आजे सासूची हत्या

शर्टाचे बटण उघडे ठेवल्यामुळे गुन्हा !

सुप्रिया सुळेंना नको आहे महिला आरक्षणाचा लाभ

आता खिचडी घोटाळ्यात गजानन कीर्तिकरांच्या मुलाचे नाव !

तरीही आपण या राजकारणापासून दूर राहिले पाहिजे. जे योग्य आणि न्याय्य आहे, जे मुद्दे हाती घेणे आवश्यक आहे, ते योग्य माध्यमांतूनच उचलले गेले पाहिजेत. तरच यातून योग्य तो मार्ग निघू शकतो,’ असे भदौरिया म्हणाले. तसेच, वेतन आयोग आणि ‘वन रँक वन पेन्शन’शी संबंधित योजनांमध्ये काही विसंगती उद्‌भवल्या आहेत, याची कबुलीही त्यांनी दिली. या बाबी मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणांचे निराकरण होण्यास जास्त वेळ लागत असला तरी, याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे सक्रियपणे लक्ष दिले जात नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Exit mobile version