“कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने करा, त्याला ब्रह्मवाक्य समजू नका”

नगर रचना आणि मूल्यांकन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी मार्गदर्शन सत्राचे आयोजन

“कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने करा, त्याला ब्रह्मवाक्य समजू नका”

राज्यातील महायुती सरकारच्या कामकाजाला १०० दिवस पूर्ण झाले असून यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अतंर्गत अविनाश पाटील (संचालक, नगर रचना महाराष्ट्र राज्य) यांच्या कल्पनेतून नगर रचना आणि मूल्यांकन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स) मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

नगर रचना आणि मूल्यांकन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या या कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी मार्गदर्शन सत्रामध्ये राज्यातील सुमारे ६५० अधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी डॉ. दीपक शिकारपूर यांनी या सत्रामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला नगर रचना विभागाचे संचालक अविनाश पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे ही वाचा : 

Bigg Boss 18 : देशातील पहिल्या एआय सुपरस्टारचे बिग बॉस १८ मध्ये स्थान निश्चित!

हे तर मुस्लिम हृदयसम्राट !

भाजपा कार्यकर्त्याची आत्महत्या; चिठ्ठी लिहित काँग्रेस नेत्यांवर केले आरोप

मनोज कुमार : अभिनेता, दिग्दर्शक आणि होमिओपॅथीचा डॉक्टरही!

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरापूर्वी योग्य आणि विश्वासार्ह माहितीचे संकलन होणे आवश्यक असते. नगर रचना आणि मूल्यांकन विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना विभागाच्या आवश्यकतेनुसार परिणाम साधण्यासाठी सुयोग्य प्रॉम्पटस्‌‍ वापरणे तसेच शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी स्वतंत्र विभाग विकसित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यावेळी डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने करा, परंतु त्याला ब्रह्मवाक्य समजू नका असा मोलाचा सल्लाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.

असे यशस्वी झाले भाजपाचे मिशन वक्फ... | Dinesh Kanji | Waqf Amendment Bill |  Rahul Gandhi |

Exit mobile version