वायुसेनेच्या तळावर इंडस्ट्री आउटलुक इव्हेंटचे आयोजन

वायुसेनेच्या तळावर इंडस्ट्री आउटलुक इव्हेंटचे आयोजन

भारताची संरक्षण क्षमता बळकट करण्यासाठी आणि स्वदेशी नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय वायु दलाच्या वतीने इंडस्ट्री आउटरीच इव्हेंट २५ (IOE25) चे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस नियोजित असलेल्या कार्यक्रमाचा पहिला टप्पा १३ जानेवारी रोजी ऑनलाइन आणि दुसरा टप्पा १५ जानेवारी रोजी गुवाहाटी येथील वायु दलाच्या तळावर आयोजित केला जाईल. संरक्षण उद्योगातील भागीदार, नवोन्मेषक आणि स्टार्ट-अप्सना वायु दलाशी जोडण्यासाठी IOE25 हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल त्याच बरोबर संरक्षण क्षेत्रात नवोन्मेषाची गरज तसेच आत्मनिर्भर संरक्षण परिसंस्था उभारण्याचे भारत सरकारकडून होत असलेले प्रयत्न आणि दृष्टीही त्यामुळे स्पष्ट होईल.

ऑनलाइन टप्प्यातील प्रमुख सत्रांमध्ये Dte of Aerospace Design, IAF ने हाती घेतलेल्या” आत्मनिर्भरता उपक्रमांची माहिती; DIO, MoD द्वारे ‘आयडेक्स योजना, धोरणे आणि प्रक्रियांबद्दल थोडक्यात माहिती’; DGAQA द्वारे ‘गुणवत्ता हमी आणि प्रमाणन प्रक्रियांचे सादरीकरण’; CEMILAC द्वारे ‘एअरवर्दीनेस सर्टिफिकेशन प्रोसेस ऑन प्रेझेंटेशन’ आणि एअरक्राफ्ट सिस्टम टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट (ASTE), द्वारे ‘एरोनॉटिकल आणि एव्हिएशन संबंधित सिस्टम्ससाठी प्रमाणीकरणाची आवश्यकता आणि चाचणी प्रक्रियांचा परिचय’या विषयांवरील सत्रांचा समावेश असेल.

हेही वाचा..

विख्यात शास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

सांगलीच्या श्रीराम मंदिर चौकात १०० फुटी भगवा ध्वज उभारणार

फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट ; ६ कामगारांचा मृत्यू

“दिल्लीकरांच्या पैशांनी बांधलेल्या शीशमहालाचा हिशोब केजरीवालांनी द्यावा”

गुवाहाटी येथील वायुसेनेच्या तळावर १५ जानेवारी रोजी होणाऱ्या IOE25 च्या दुसऱ्या टप्प्यात ऑपरेटरसोबत थेट संवाद होणार असल्याने उद्योग प्रतिनिधींना कार्यान्वयासाठीच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील आणि त्यांना नाविन्यपूर्ण उपायांसह कोणत्या क्षेत्रांमध्ये योगदान देता येऊ शकेल हे नेमके समजून शकेल.

संरक्षण क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या संधी ओळखून आणि भारताच्या स्वयंपूर्ण होण्याच्या धोरणात्मक उद्दिष्टाला पाठिंबा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगांसोबतचे संबंध बळकट करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. IOE25 मध्ये सहभागी होण्यासाठी, https://shorturl.at/g6684 वर नोंदणी करता येईल.

Exit mobile version