वसईची तरुणी श्रद्धा वालकर हिचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने तिची निर्घृण हत्या केली. मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. साऱ्या देशाला हादरवून टाकणारी ही घटना समोर आल्यानंतर याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, श्रद्धा हिच्या पहिल्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला वसई येथून मूक रॅली काढण्यात आली.
श्रद्धा वालकर हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी मूक रॅली वसई येथून काढण्यात आली. यावेळी अनेक तरुणांनी उपस्थित राहून रॅलीत सहभाग घेतला होता. भाजपा नेते किरीट सोमय्या हे देखील रॅलीमध्ये उपस्थित होते. श्रद्धा हिच्या वडिलांसह त्यांनी या रॅलीच्या माध्यमातून आफताब पूनावाला याच्या प्रकरणाची फास्ट ट्रॅक सुनावणी व्हावी, तिला न्याय मिळावा आणि आफताबला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली.
हे ही वाचा:
चिनाई कॉलेज सुरू करण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन
१० कोटींच्या वरील कामांवर दक्षता विभाग ठेवणार वॉच
“त्र्यंबकेश्वर मंदिरामधील घुसखोरी म्हणजे मंदिरावर कब्जा करण्याचा सुनियोजित कट समजावा”
मुंबईत आजारी मुलाला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोडले चार्टर्ड विमान
गेल्या वर्षी १८ मे रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली होती. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या राहत्या घरी जवळजवळ तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. पकडले जाऊ नये म्हणून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकले होते. हे हत्याकांड उघड होताच देशात एकच खळबळ माजली होती.