राज्यातील ४७ शहरांमध्ये ‘जल दिवाळी’ अभियानाचे आयोजन  

राज्यातील ४७ शहरांमध्ये ‘जल दिवाळी’ अभियानाचे आयोजन   

राज्यात ७ ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत “जल दिवाळी’ साजरी करण्यासाठी ‘दीनदयाळ अंत्योदय योजना’ ‘राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ (DAY-NULM) व अमृत योजना यांच्या सहकार्याने ‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान” नावाचा एक अनोखा उपक्रम राज्यातील २४ महानगरपालिका व २३ नगरपरिषदांमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमामुळे स्वयंसहाय्यता बचतगटांमधील (SHG) महिलांना त्यांच्या संबंधित शहरांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रास (WTPS) भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या भेटींदरम्यान घरोघरी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या विविध प्रक्रियांची गटातील महिलांना माहिती देण्यात येत आहे. याशिवाय, नागरिकांना उच्च गुणवत्तेचे पाणी मिळेल याची खात्री करून घेणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचणी प्रक्रियेबद्दल साक्षर करण्यात येत आहे.

हेही वाचा.. 

जबलपूरमध्ये सैन्य दलाच्या गाडीला अपघात; महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरेंची निवड!

अमेरिकेच्या अर्थसहाय्याने अदानी समूह श्रीलंकेत उभारणार बंदर, चीनची कोंडी

हमासच्या नरसंहारातून बचावलेल्या विद्यार्थ्यांनी कथन केला प्रसंग

पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत महिलांमध्ये आपलेपणा आणि मालकीची भावना वाढवणे हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे. शिवाय या भेटीमुळे महिलांना मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी निर्माण होईल. सर्वसमावेशकता आणि सहभाग याला चालना मिळेल. या उपक्रमांतर्गत ४७ शहरांमध्ये ८३  जलशुद्धीकरण केंद्रांना साधारण २ हजार महिला सदस्यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आलेले आहे.

या भेटीमध्ये बचत गटांमधील महिलांना ‘जल दिवाळी’ चे किट भेट म्हणून दिले जाणार आहे. भेटीच्या ठिकाणी प्रशिक्षित व्यक्तीकडून जल शुद्धीकरण पद्धती सर्वांना सांगण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त बचत गटांमधील महिलांना सहभागी करून घेण्यात यावे, असे आवाहन आयुक्त तथा राज्य अभियान संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई मनोज रानडे यांनी केले आहे.

Exit mobile version