मथुरेतील शाही ईदगाह मशिदीच्या जागेचा सर्व्हे होणार

अलहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

मथुरेतील शाही ईदगाह मशिदीच्या जागेचा सर्व्हे होणार

मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी संकुलातील शाही इदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेच्या सर्वेक्षणाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे. न्यायालयाने शाही इदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेवर सर्वेक्षण करण्यास मान्यता दिली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवार, १४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता मथुरा येथील श्री कृष्णजन्मभूमी प्रकरणाची देखभाल क्षमता आणि न्यायालयाच्या आयुक्तांना पाठवण्या बाबतच्या अर्जावर निकाल दिला. हिंदू बाजूच्या याचिकेवर न्यायमूर्ती मयंक जैन यांच्या खंडपीठाने सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. प्रार्थना स्थळ कायद्यांतर्गत खटल्याच्या देखभालीबाबत आक्षेप घेण्यात आला. न्यायालयाच्या आयुक्तांना पाठविण्याबाबत मंदिराच्या बाजूने केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि शाही इदगाह व्यवस्था समितीला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ दिला होता, त्यावर आज न्यायालयाने निकाल देत सर्वेक्षणास मान्यता दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण आयुक्त नेमण्यात येणार असून, ते संपूर्ण सर्वेक्षणावर लक्ष ठेवतील.

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचा वाद अनेक दशके जुना आहे. मथुरेचा हा वाद एकूण १३.३७ एकर जमिनीच्या मालकीशी संबंधित आहे. १२ ऑक्टोबर १९६८ रोजी श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानने शाही मशीद इदगाह ट्रस्टशी करार केला. या करारात या जागेवर मंदिर आणि मशीद दोन्ही बांधण्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, श्रीकृष्ण जन्मस्थानकडे १०.९ एकर जमिनीचा मालकी हक्क आहे तर शाही इदगाह मशिदीकडे अडीच एकर जमिनीचा मालकी हक्क आहे. हिंदू बाजूने शाही इदगाह मशिदीचे वर्णन बेकायदेशीरपणे कब्जा करून बांधलेली रचना आहे आणि या जमिनीवर दावाही केला आहे. शाही ईदगाह मशीद हटवून ही जमीन श्रीकृष्ण जन्मभूमीला देण्याची मागणी हिंदूंकडून होत आहे.

हे ही वाचा:

सुरक्षा भंग केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाकडून आठ कर्मचाऱ्यांचे निलंबन

संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकन होणार

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मोठा निर्णय

‘प्रेक्षक पाससाठी घुसखोर सातत्याने सेक्रेटरीच्या संपर्कात’

असा दावा केला जातो की, औरंगजेबाने श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर बांधलेले प्राचीन केशवनाथ मंदिर नष्ट केले आणि त्याच ठिकाणी १६६९- ७० मध्ये शाही ईदगाह मशीद बांधली. यानंतर १७७० मध्ये गोवर्धन येथे मुघल आणि मराठ्यांमध्ये युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांचा विजय झाला. विजयानंतर मराठ्यांनी पुन्हा मंदिर बांधले. १९३५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने बनारसचे राजा कृष्ण दास यांना १३.३७ एकर जमीन दिली. १९५१ मध्ये श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्टने ही जमीन संपादित केली.

Exit mobile version