इक्बाल सिंग चहल यांना हटविण्याचे आदेश

केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश, सहा राज्यातील गृहसचिवांनाही हटविणार

इक्बाल सिंग चहल यांना हटविण्याचे आदेश

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अनेक अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. तसेच सहा राज्यांमधून गृह सचिवांना तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना हटवलं आहे. तसेच निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांमधील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन वर्ष पूर्ण झाला आहे किंवा ते त्यांच्या गृह जिल्ह्यांत कार्यरत आहेत त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, असा आदेश निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिला आहे. सोमवार, १८ मार्च रोजी नवे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासह मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. यावेळी आयोगाने राज्य सरकारच्या निवडणुकीशी संबधित आणि कामाशी संबधित आधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

शाळेत ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी ‘जय श्री राम’ बोलल्यामुळे विद्यार्थिनीला शिक्षा

एसबीआयला निवडणूक रोख्यांचे सर्व तपशील उघड करण्याचे निर्देश

एल्विश यादवने पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरविल्याची दिली कबुली!

कोलकात्यात पाच मजली इमारत झोपड्यांवर कोसळली!

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने राज्यातील काही महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांबाबत आयोगाच्या सूचनांचे पालन केलेले नाही. याबाबत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडे नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने मुख्य सचिवांना महाराष्ट्रातील महानगरपालिकांचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले असून, त्यासंबंधीचा अहवाल आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत देण्यास सांगितले आहे.

Exit mobile version