24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषउल्हासनगरमधील ५०० हून अधिक इमारती निकृष्ट

उल्हासनगरमधील ५०० हून अधिक इमारती निकृष्ट

Google News Follow

Related

उल्हासनगरमधील ५०० हून अधिक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांनी नेमलेल्या समितीने १९९० च्या आसपास ज्या इमारती बांधल्या अशांपैकी ५०० इमारतींची यादी तयार केलेली आहे. त्यामुळे आता एकूणच पुन्हा एकदा उल्हासनगरमधील बेकायदा बांधकामाविषयी पुन्हा एकदा जोरदार चर्चा होऊ लागली आहे. अलीकडेच उल्हासनगरमधील दोन इमारती कोसळल्यामुळे काही जणांना आपला प्राण गमवावा लागला.

पॅनेलच्या अहवालानुसार यापैकी बहुतेक इमारती निकृष्ट दर्जाच्या वाळूचा वापर करून तयार करण्यात आल्या आहेत. समितीने पालिका प्रभागातील अशा इमारतींची यादी तयार केली आहे – प्रभाग ४नमधील अशा इमारतींची जास्तीत जास्त संख्या (१६०) तर प्रभाग २ मधील १३३, प्रभाग ३ मधील ११८ आणि प्रभाग १ मधील ९४ अशा इमारती आहेत.

हे ही वाचा:

वेळ मारून नेणाऱ्यांचे तोंडावर आपटणे नेहमीचेच

पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघातच झाडांची कत्तल

चित्रिकरणासाठी निर्बंध उठले परंतु प्रश्नचिन्ह कायम

मालवणीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सहा जणांना अटक

या इमारतीतील नागरिकांनी तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे आवाहन पालिकेने शनिवारी केले. गेल्या महिन्यात उल्हासनगरमधील मोहिनी पॅलेस आणि साई शक्ती या दोन इमारती पंधरा दिवसात कोसळल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला. या दोन्ही इमारती १९९० नंतर बांधण्यात आल्या होत्या. उल्हासनगर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. युवराज भदाणे म्हणाले की, शहरातील अनेक इमारती १९९४ ते १ दरम्यान कोसळल्या आहेत. आता नागरी समितीने अशा सर्व इमारतींचा तपशील गोळा केलेला आहे. जर रहिवाशांनी त्यांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट प्राधान्याने केले नाही तर आम्हाला त्यांना जबरदस्ती हलवावे लागेल असेही ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा