कोरोनाचे मळभ दूर होऊन आता दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. याच आधारावर मागील दोन वर्षांपासून रस्त्यावरील बांधकाम दुर्लक्षित झाले होते. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात ‘सार्वजनिक बांधकाम मंत्री राजेंद्र चव्हाण’ यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत सर्व यंत्रणांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे दुरुस्तीकरण येत्या २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात सह्याद्री अतिथी गृहात बैठक झाली होती. सध्या या महामार्गावर खड्डे आणि दुरुस्ती करण्याचे काम कंत्राटदारांकडून चालू आहेत. मात्र हेच काम युद्धपातळीवर होण्यासाठी आवश्यक तेथे अधिक कंत्राटदार लावून ताकदीने व युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याच्या सूचना चव्हाण यांनी केल्या आहेत. तसेच या बैठकीत कोकणातील मंत्री व खासदारासह आमदारही उपस्थित होते.
हे ही वाचा:
आसाममध्ये बाहेरून येणाऱ्या इमामांना नोंदणी करावी लागणार
विधानभवनाजवळ शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
जागतिक वडापाव दिन: मुंबईची ओळख असणाऱ्या वडापावचा जन्म कसा झाला झाला?
डान्सर सपना चौधरीला होणार अटक?
मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्ती संदर्भात कोकणातील आपापल्या मतदारसंघातील आमदार, खासदारांनी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या होत्या, या सूचनांचा सकारात्मक पद्धतीने विचार करून त्यावर तातडीने निर्णय घेऊन काम करण्याची सूचना मंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास केल्या, गणपती उत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीने ट्रॅफिक वॊर्डन तैनात करून, वाहतूक व्यवस्थापन सुरळीत चालू ठेवण्याचे आदेश वाहतूक विभागाला दिले आहेत.