‘घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश’

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विटकरत दिली माहिती

‘घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश’

मुंबईत वादळीवाऱ्याच्या पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनेच्या घटना घडल्या आहेत. घाटकोपर आणि वडाळा येथे होर्डिंग्ज कोसळल्यामुळे अनेक लोक गंभीर जखमी झाले असून अनेक जण अजूनही होर्डिंग्ज खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

अवकाळी पावसाच्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमधील आझाद बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या भारत पेट्रोल पंपावर एक मोठं होर्डिंग्ज कोसळलं आहे.संपूर्ण पेट्रोल पंप या होर्डिंग्जखाली दबला आहे.या होर्डिंग्जखाली १०० हुन अधिक माणसे दबल्याचे सांगण्यात येत आहे.प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महानगर पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.

हे ही वाचा:

‘पावसामुळे घटकोपरमध्ये होर्डिंग कोसळले; अनेक गाड्या, लोक दबल्याची भीती’

बीडमध्ये होणार पवारांच्या जातवादी राजकारणाची अखेर

मतदारांची ओळख पटवण्यासाठी बुरखा काढायला लावला!

दरम्यान, या दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विटकरत याची माहिती दिली.त्यांनी ट्विट करत लिहिलं की, घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ४७ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल.या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमैया यांनी घटनास्थळी भेट देऊन होर्डिंग्जच्या मालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.ते म्हणाले की, कोसळलेलं होर्डिंग्ज अनधिकृत होत अन याची माहिती महापालिकेला आम्ही दिली होती.या होर्डिंग्जसाठी त्या मालकाने आसपासची झाले केमिकल टाकून मारली होती.त्यामुळे त्याला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Exit mobile version