डीआरडीओच्या संशोधनामुळे ऑक्सिजन सिलेंडरचा सर्वोत्तम वापर शक्य

डीआरडीओच्या संशोधनामुळे ऑक्सिजन सिलेंडरचा सर्वोत्तम वापर शक्य

देशात कोविडने थैमान घातलेले असताना अनेक रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशा वेळेस ऑक्सिजनचा सिलेंडरचा पुरेपुर वापर होण्यासाठी डीआरडीओने एका यंत्राची निर्मीती केली आहे. त्याबरोबरच पीएम- केअर्स फंडमधून या अशा १.५ लाख यंत्रांची मागणी करण्यात आली आहे. शिवाय त्यासाठी ३२२.५ कोटी रुपये देखील मोजण्यात आले आहेत.

डीआरडीओने विकसित केलेल्या या यंत्रणेचे नाव ऑक्सिकेअर असे आहे. या १.५ लाखांपैकी १ लाख यंत्रणा मनुष्यसंचालित असतील तर ५० हजार यंत्रणा स्वयंचलित असतील. ही यंत्रणा मानवाच्या रक्तातील SpO2 पातळीवरून रुग्णाला प्राणवायूचा पुरवठा करते.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे तोंडावर गोड, आतून महाकपटी

‘लॅन्सेट’च्या भारतविरोधी लेखामागे ‘चायनाचा हात’

बार मालकांप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही पत्र लिहा

व्यापाऱ्यांचे तब्बल ५० हजार कोटींचे नुकसान, अनलॉक होणार?

SpO2 रक्तातील प्राणवायूची पातळी निर्देशित करते. त्यानुसार रुग्णाला किती प्राणवायूचा पुरवठा करण्याची गरज आहे, हे निश्चित होते. त्यामुळे ज्या रुग्णांची पातळी खालावली आहे त्यांना त्या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा करून प्राणवायूच्या अभावी होणारा मृत्यु टाळला जाऊ शकतो.

ही यंत्रणा डीआरडीओच्या डिफेन्स बायो-इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रो मेडिकल लॅबोरेटोरी (डीईबीईएल) या विभागाने तयार केली आहे.

ही यंत्रणा मानवसंचालीत आणि स्वयंचलीत अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. दोन्ही यंत्रणांमध्ये विविध छोट्या छोट्या भागांचा अंतर्भाव होतो. स्वयंचलित यंत्रणेत एक इलेक्ट्रिक नियंत्रक देखील लावलेला असतो, जो रुग्णाच्या रक्तातील प्राणवायूची पातळी मोजून त्यानुसार आपोआप प्राणवायूच्या पुरवठा निश्चित करतो. या यंत्रणेमुळे ऑक्सिजनच्या एका सिलेंडरचा पुरेपुर वापर केला जाऊ शकेल.

डीआरडीओने हे तंत्रज्ञान इतर अनेक उत्पादकांकडे हस्तांतरित केले आहे. त्यामुळे या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ शकेल.

Exit mobile version