22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषम्हणे प्रपोगंडा फिल्म... 'द केरळ स्टोरी' प्रसारणाला विजयन यांचा विरोध

म्हणे प्रपोगंडा फिल्म… ‘द केरळ स्टोरी’ प्रसारणाला विजयन यांचा विरोध

Google News Follow

Related

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि प्रचंड लोकप्रियता मिळालेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट आता दूरदर्शनवर प्रसारित होणार आहे. एका बाजूला हा चित्रपट प्रसारित होत असल्याच्या निर्णयाचे समाजातून स्वागत होत असताना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या प्रसारणाला विरोध केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून समाजात द्वेष भावना पसरवली जाईल त्यामुळे राष्ट्रीय प्रसारकांनी असे चित्रपट दाखवू नयेत, असे विजयन यांनी म्हटले आहे. तशी त्यांनी एक पोस्ट एक्सवर केली आहे. ५ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुळात द केरळ स्टोरी या चित्रपटवरून विजयन यांनी भाजप आणि आरएसएस ला का लक्ष्य केले, असा सवाल आता समाजातून विचारला जात आहे. हा चित्रपट म्हणजे भाजप किंवा आरएसएस कडून तयार करण्यात आलेला नाही त्यामुळे या चित्रपटाच्या मुद्द्यावरून भाजप आणि आरएसएसला लक्ष्य करणे हे हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया आता समाजातून व्यक्त होऊ लागली आहे.

हेही वाचा..

अरुण गवळी उर्फ डॅडीची तुरुंगातून सुटका होणार; मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश

काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध!

केजरीवाल यांचा फोटो पाहून भगतसिंग यांच्या नातूचा संताप!

“भारतातील निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात हे संयुक्त राष्ट्रांनी शिकवू नये”

सत्ताधारी सीपीआयने या चित्रपटाचे प्रसारण करण्याचा निर्णय मागे घ्यावा असे निवेदन दिले आहे. धर्मनिरपेक्ष केरळ समाजाच्या “ध्रुवीकरणाच्या भाजपच्या प्रयत्नात” उभे राहू नका, असेही त्यांनी म्हटले आहे. निवडणुका आल्याने भाजपकडून असे चित्रपट प्रसारित केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान केरळ उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. कारण या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायासाठी आक्षेपार्ह असे काहीच नाही, असे न्यायालयाने म्हटले होते म्हणून चित्रपटाच्या प्रदर्शनास न्यायालयाने स्थगिती दिली नाही. याशिवाय न्यायालयाने म्हटले होते की,सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने चित्रपटाचे परीक्षण केले आहे आणि चित्रपट सार्वजनिक प्रदर्शनासाठी योग्य असल्याचे आढळले आहे.

केरळमधील ३२ हजार महिलांचे धर्मांतर झाले आणि कट्टरपंथी बनले आणि त्यांना भारत आणि जगात दोन्ही ठिकाणी दहशतवादी मोहिमांमध्ये तैनात करण्यात आले असा “खोटा” दावा करण्यासाठी चित्रपटाच्या ट्रेलरवर कठोर टीका केली गेली होती आणि कोर्टासमोर आव्हान दिले गेले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा