आगामी जी-२० परिषदेच्या भोजनासाठी राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रणात प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेन्ट ऑफ भारत असे लिहिल्यामुळे देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. त्यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष बिथरले. तिथे काहींच्या प्रतिक्रिया भारत या नावाला संपूर्ण पाठिंबा देणाऱ्याही होत्या.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, देशाचे नाव बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही. पण सत्ताधारी असे नाव बदलण्यासाठी का आग्रही आहेत? पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांचा भारत या नाव बदलामुळे चांगलाच तीळपापड झाला. त्या म्हणाल्या की, भाजपाचे संसदेत बहुमत आहे म्हणून ते संपूर्ण देश त्यांची जागीर असल्याचे मानतो की काय? भाजपाची यातून असहिष्णुता दिसून येते.
तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जींनीही नापसंती व्यक्त केली. अचानक देशाचे नाव भारत ठेवण्याची गरज का निर्माण झाली. अर्थात, यात नवीन काय आहे? इंग्रजीत आपण इंडिया म्हणतो. सगळे जग आपल्याला इंडिया म्हणून ओळखते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, इंडिया हा शब्द संविधानात समाविष्ट आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असे त्याला म्हणतात. हा शब्द आपण स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्याचे नाव भारत बदलण्याला काही अर्थ नाही.
काँग्रेसचे नेते वेणुगोपाल यांनी तर त्या पुढे जाऊन प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष भारतीय आणि इंडियन यांच्यात संघर्ष निर्माण करत आहेत. आपण एकच आहोत. माहिती मंत्री राजीव चंद्रशेखर यांना मात्र या नामबदलात काही वेगळे वाटत नाही. ते म्हणतात की, मला कळत नाही नेमकी समस्या काय आहे. आपला देश भारत आहे. भारत असा उल्लेख करण्यास मला काहीही समस्या वाटत नाही. आपण वाट पाहूया की या मुद्द्याचा विशेष अधिवेशनात समावेश होतो का ते!
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवालही भारत असा नामबद्ल केल्यामुळे संतापले आहेत. देश १४० कोटी लोकांचा आहे. जर भारत नाव ठेवले तर उद्या तेही नाव बदलून त्याचे नाव बीजेपी ठेवले जाणार आहे का? ही काय थट्टा आहे. हजारो वर्षांची संस्कृती असलेला हा देश आहे. आमची आता इंडिया ही आघाडी तयार झाली आहे, त्याचेही नाव बदलणार का मग.
हे ही वाचा:
प्रज्ञानंदचा आत्मविश्वास; ‘माझ्यात विश्वविजेता होण्याची क्षमता’
प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया नव्हे प्रेसिडेन्ट ऑफ भारत
जिल बायडेन करोना पॉझिटिव्ह; जी- २० साठी जो बायडेन यांच्यासह येणार होत्या भारत दौऱ्यावर
आदित्य एल १ पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत स्थिरावले
सेहवाग म्हणतो, इंडिया हे नाव इंग्रजांनी दिलेले! भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा आपल्या सडेतोड प्रतिक्रियांसाठी ओळखला जातो. त्याने यासंदर्भात लागलीच प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला की, माझी नेहमीच भूमिका राहिली आहे की, नावातून जर आपल्यात अभिमानाची भावना निर्माण होत असेल तर तेच नाव असले पाहिजे. आपण भारतीय आहोत. इंडिया हे नाव इंग्रजांनी दिलेले आहे. आपल्या देशाचे मूळ नाव भारत हेच आहे. मी भारतीय क्रिकेट बोर्डालाही विनंती करतो की, त्यांनी भारतीय संघाच्या जर्सीवर इंडियाऐवजी भारत असे छापावे. सेहवागने सांगितले की, १९९६च्या वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्स संघ हॉलंड म्हणून भारतात खेळला. पण २००३मध्ये त्यांनी नेदरलँड्स हे नाव ठेवले, ते आजतागायत. बर्माचे नाव इंग्रजांनी ठेवले होते, ते नाव आता म्यानमार आहे.