उल्हासनगरमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास विरोध, खोदलेला खड्डा बुजवला!

नागरिकांकडून संताप व्यक्त

उल्हासनगरमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास विरोध, खोदलेला खड्डा बुजवला!

चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदेचा नुकताच पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. मृत अक्षयच्या कारनाम्यामुळे बदलापूरसह अन्य स्मशान भूमीत दफन करण्यावर तेथील स्थानिक नागरिक विरोध करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत अक्षयचा मृतदेह उल्हासनगरमध्ये दफन करण्यात येणार होता, त्यासाठी खड्डा देखील खोदण्यात आला होता. मात्र, स्थानिकांना याची माहिती मिळताच पुरुष,महिला एकवटून विरोध दर्शवत मृतदेह पुरण्यासाठी खोदलेला खड्डा सर्वांनी बुजवून टाकला.

आरोपी अक्षयचा मृतदेह ६ दिवसांपासून कळव्याच्या शवगृहात आहे. मृतदेह दफन करण्यासाठी बदलापूर, अंबरनाथ, कळवा येथील स्मशान भूमीचा शोध पोलीस घेत आहेत. याच दरम्यान, पोलिसांनी उल्हासनगर मधील स्मशान-दफन भूमीचा शोध घेतला आणि याच ठिकाणी मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पहाटे खड्डा देखील खोदण्यात आला. परंतु, याची माहिती स्थानिकांना मिळाली आणि सर्वजण स्मशान भूमीत जमले.

हे ही वाचा : 

काँग्रेसच्या सभांमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

सोमनाथ मंदिराजवळील बेकायदेशीर मशीद, कब्रस्तान आणि दर्गा जमिनदोस्त

मास्टर्स ऑफ सर्जरीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीचा स्फोट, पाच जवान जखमी!

स्थानिक शिंदे शिवसेनेच्या महिला-पुरुष, यासह परिसरातील महिला, पुरुष, आणि तृतीय पंथी देखील एकत्र जमले. बघता-बघता नागरिकांची संख्या वाढली आणि संतप्त लोकांनी आरोपी अक्षयचा निषेध करत त्याचा मृतदेह आमच्या परिसरात नको, असा रेटा लावला. अखेर संतप्त महिलांनी मृतदेह पुरण्यासाठी खोदण्यात आलेला खड्डा बुजवून टाकला. दरम्यान, स्थानिक पोलीस घटनास्थळी झाले आहेत. विरोध करणाऱ्या महिला, पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आल असून याच ठिकाणी अक्षयचा मृतदेह दफन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Exit mobile version