इंग्लंडचा क्रिकेट संघ लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात २५ जानेवारीपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये होणार आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजचे पुनरागमन झाले आहे. तर, आवेश खान आणि मुकेश कुमार यांचीही संघात वर्णी लागली आहे. अक्षर पटेल, कुलदीप यादव हे फिरकीपटू आणि रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन हे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज शमी हा संघाचा भाग नसून २०२३ च्या विश्वचषकात शमीने शानदार गोलंदाजी केली होती.
युवा खेळाडू आणि यष्टीरक्षक इशान किशनला संघातून वगळण्यात आले आहे. के. एल राहुल, के. एस. भारत आणि ध्रुव जुरेल या तीन यष्टीरक्षकांना संघात स्थान देण्यात आले आहे. ध्रुव जुरेल याला संघात स्थान मिळाले आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये तो उत्तर प्रदेशकडून खेळतो. अंडर १९ इंडिया अ संघाकडूनही तो खेळला आहे. त्याची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील कामगिरी चांगली राहिली आहे. ध्रुव जुरेलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना शानदार कामगिरी केली आहे.
An action-packed Test series coming 🆙
Check out #TeamIndia's squad for the first two Tests against England 👌👌#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vaP4JmVsGP
— BCCI (@BCCI) January 12, 2024
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंची चिडचिड; अटल सेतू बांधला पण अटलजींचा फोटो कुठे होता?
संगीत विश्वातला तारा निखळला; ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन
इंडिया गटाच्या बैठकीत ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत
निवृत्त होईपर्यंत आठवड्याला ८० ते ९० तास काम करायचे नारायणमूर्ती
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल(यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान