विरोधकांनी बीड जिल्ह्यात जरुर जावे, पण त्याचे पर्यटन करू नये!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

विरोधकांनी बीड जिल्ह्यात जरुर जावे, पण त्याचे पर्यटन करू नये!

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची सध्या राज्यभरात चर्चा आहे. पोलिसांकडून हत्येचा तपास सुरु आहे. गुन्ह्यात समावेश असणाऱ्यांवर कडक करण्यात येईल, यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे.

या घटनेनंतर विरोधक-सत्ताधारी नेते देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान केले आहे. विरोधकांनी बीड जिल्ह्यात जरुर जावे, पण त्याचे पर्यटन करू नये, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा : 

१९९८ च्या ‘त्या’ घटनेमुळे अटलबिहारी वाजपेयीजींच्या नेतृत्वाचे दर्शन जगाला झाले!

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या १००व्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली!

‘आदित्य ठाकरेंचे वय आहे तेवढीही त्यांना अक्कल नाही’

दिल्लीत ‘बांगलादेश’वर बंदी; व्यापार करणार नाहीत!

नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, घटना महत्वाची आहे. अधिवेशन सुरु असताना मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली, त्यानंतर ते त्याठिकाणी गेले. आमच्या मंत्र्यांनी देखील त्यांची भेट घेतली. एखाद्या घटनेचे महत्व कोण गेले आहे यापेक्षा आपण किती प्रतिसाद देतो हे महत्वाचे आहे.

प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतीलच असे नाही. अशा घटना संवेदनशील असतात, शासनातर्फे-विरोधकांतर्फे कोणीतरी गेले पाहिजे. पण त्याचे पर्यटन करू नये, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Exit mobile version