हमास समर्थक, झाकीर नाईक समर्थक विचारांच्या मुख्याध्यापकांची हकालपट्टी!

सोमय्या शाळेची परवीन शेख यांच्यावर कारवाई

हमास समर्थक, झाकीर नाईक समर्थक विचारांच्या मुख्याध्यापकांची हकालपट्टी!

मुंबईस्थित सोमय्या ट्रस्टने मंगळवार, ७ मे रोजी परवीन शेख यांची सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका पदावरून हकालपट्टी केली. परवीन शेख यांनी हमास, इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईक, दिल्लीतील दंगलीचा कथित सूत्रधार उमर खालिद यांना पाठिंब्या दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

सोमय्या ट्रस्टने या संदर्भात निवेदन जाहीर केले आहे. ‘अलीकडेच आमच्या निदर्शनास आले आहे की, सोमय्या स्कूलमध्ये नेतृत्वाचे पद भूषविणाऱ्या परवीन शेख यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेली त्यांची वैयक्तिक मते आम्ही जपतो त्या मूल्यांशी मेळ खात नाहीत. या चिंतेचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि काळजीपूर्वक विचार केल्यानंतर, व्यवस्थापनाने परवीन शेख यांचा सोमय्या विद्याविहारशी असलेला संबंध तोडून टाकला आहे, जेणेकरून आमच्या एकता आणि सर्वसमावेशकतेच्या मूल्यांशी तडजोड होणार नाही,’ असे सोमय्या ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

‘सोमय्या विद्याविहार सर्व संस्कृती आणि श्रद्धांचा सन्मान आणि आदर करणारे, समाज आणि आपल्या राष्ट्रासाठी सकारात्मक योगदान देणारे शैक्षणिक वातावरण प्रदान करण्यासाठी समर्पित आहे,’ असेही त्यांनी नमूद केलेले आहे.
निरागस लहान मुलांचे रक्षण करण्याच्या महत्त्वावरही त्यांनी जोर दिला आहे. ‘आमच्या तरुणांच्या प्रभावशाली मनाचे रक्षण करणे आणि त्यांचे पालन-पोषण अशा वातावरणात करणे महत्त्वाचे आहे, जे अखंडतेचे आणि सर्वसमावेशकतेचे उच्च मापदंड राखून ठेवते याची सुनिश्चिती करणे महत्त्वाचे आहे, असे आम्हाला वाटते,’ असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

नीरव मोदी याला ब्रिटनच्या न्यायालयाचा धक्का!

खलिस्तान समर्थक परेडमध्ये ‘हिंसेचा उत्सव’;भारताने कॅनडाला सुनावले!

बंगाल शिक्षक भरती रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!

‘आसाममध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान’

२४ एप्रिल रोजी, एका वृत्तात या प्राचार्यांचे इस्लामी विचार आणि सोशल मीडियावर त्यांचा भारतविरोधी घटकांकडे असणारा कल, याचा आढावा घेण्यात आला होता. दहशतवादी इस्माईल हनीयेह यांसारख्या वरिष्ठ नेतृत्वाला पाठिंबा देणाऱ्या, हमासच्या इस्रायलविरुद्धच्या त्यांच्या ‘प्रतिकाराला’ समर्थन देणाऱ्या हमासच्या घोषणा त्यांनी ‘लाइक’ केल्या होत्या. त्यांनी इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईक आणि दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीचा सूत्रधार उमर खालिद यांसारख्या कट्टरपंथीयांचेही समर्थन केले आहे.

हिंदूंच्या पवित्र मिरवणुकीवर कट्टरतावाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांसाठी हिंदूनाच जबाबदार धरणारे ट्वीटही त्यांनी ‘लाइक’ केले आहेत. शिवाय, अरब देशांसमोर हिंदूंना भिकारी म्हणून चित्रित करणारी चित्रे पाहूनही त्यांना आनंद होतो. तसेच, त्या अयोध्येतील राम मंदिराला विरोध करतात. शेख यांच्या या मतांचे वृत्त प्रकाशित होताच, सोमय्या ट्रस्टने या प्रकरणाची दखल घेऊन त्यांना निलंबित केले आहे. तसेच, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले आहे. आता ट्रस्टने परवीन शेख यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

Exit mobile version