टाटांचा महिलांसाठी ‘हा’ अभिमानास्पद निर्णय

टाटांचा महिलांसाठी ‘हा’ अभिमानास्पद निर्णय

महिला सक्षमीकरणासाठी टाटा समुहाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीने (IHCL) टाटा समूहासोबत मुंबईमधील सांताक्रूझ येथे नवीन जिंजर हॉटेलचे बांधकाम केवळ महिला करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

पुरुषांचे जास्त वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात महिलांना समान संधी देण्यासाठी टाटा समूहाने हे अभिमानास्पद पाऊल उचलले आहे. महिलांसाठी विविध क्षेत्रात काम करण्याची संधी देण्यासाठी हा प्रकल्प एक महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे.” १९ हजार चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले ३७१ खोल्यांचे हॉटेल १९ महिन्यांच्या कालावधीत बांधले जाईल.

हे ही वाचा:

चक्क सापाला हातात धरून मारल्या दोरीउड्या

केरळमधील शाळेत मुलं- मुली वापरणार सारखाच गणवेश

अबब! भटक्या कुत्र्यांना खायला घातले म्हणून एवढा दंड?

राज्य परीक्षा अधिकाऱ्याच्या घरात सापडले घबाड

आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुनीत छटवाल यांनी म्हटले की, “आम्ही सर्वांना समान संधी उपलब्ध करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आज, जग अशा भविष्याकडे वाटचाल करत आहे जिथे महिला क्षेत्रांमध्ये यशस्वी होत आहेत. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडसोबतची ही भागीदारी या विश्वासाचा पुनरुच्चार करते. नवीन जिंजर सांताक्रूझच्या बांधकामाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व महिलांचा आम्हाला अभिमान आहे.

Exit mobile version