आंतरवाली सराटीतील गावकरीच जरांगेच्या विरोधात!

आंदोलनाला परवानगी नको अशी मागणी

आंतरवाली सराटीतील गावकरीच जरांगेच्या विरोधात!

मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगेबाबत मोठी बातमी समोर आली आहे.मराठा आरक्षण आणि सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाची बसणार आहेत.मनोज जरांगे उद्या म्हणजे ४ जूनला आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत.मात्र, जरांगेंच्या उपोषणाला आंतरवाली सराटीतील काही गावकऱ्यांनी विरोध केला आहे.याबाबत काही गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी मागणी केली आहे.दरम्यान, ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आंदोलक-उपोषणकर्ते मनोज जरांगे ४ जूनपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत.मात्र, जरांगेंच्या उपोषणाला आंतरवाली सराटीमधील काही गावकऱ्यांनी विरोध केला आहे.जरांगे पाटील यांचे सहकारी राहिलेले डॉ.रमेश तारख, किरण तारख यांच्यासह गावातील काही गावकर्यांनी उपोषणाला विरोध दर्शविला आहे.या संदर्भात गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देखील दिले आहे.या निवेदनावर गावातील १०० हुन अधिक लोकांच्या सह्या असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

एग्झिट पोलनंतर आता मतमोजणीवर लक्ष

मालदीवने दाखवली पॅलेस्टाइनप्रति एकजूटता

उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषद भोवणार, कारवाईचे आदेश

राममंदिराच्या पुजाऱ्याने पंतप्रधान मोदींबाबत सांगितले मोठे भविष्य!

आंतरवलीतील सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच मनोज जरांगे यांचे आंदोलन हे द्वेष, राग आणि तिरस्कारामध्ये परावर्तित झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.जरांगेंच्या उपोषणामुळे कायदाव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि जातीं तेढातून भांडणे होऊ शकतात, असे निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version