लोकसभा निवडणुका अवघ्या काही आठवड्यांवर आलेल्या असताना सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. पंतप्रधान पदासाठीचा चेहरा एनडीएकडे असून इंडिया आघाडीने अद्याप त्यांचा पंतप्रधान पदासाठीचा चेहरा जाहीर केलेला नाही. आगामी लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही.
दरम्यान, पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंती कोणाला याचा एक सर्व्हे करण्यात आला आहे. ‘टीव्ही ९’ने यासंदर्भात माहिती दिली आहे. इंडी आघाडीतून अद्याप पंतप्रधान पदासाठी चेहरा समोर आलेला नसला तरी या आघाडीमध्ये राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव असे नेते आहेत. इंडिया आघाडीमध्ये अजूनही जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला नाही.
हे ही वाचा:
पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी भाजपात!
अनिल परबांना दणका; दापोलीमधील साई रिसॉर्ट चार आठवड्यात पाडावे लागणार
शेजारच्यांकडे लिंबू मागणे कॉन्स्टेबलला पडले महागात!
पाटणामधील सिव्हील कोर्टात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट
अशातच आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंतीचा चेहरा बनले आहेत. सर्वेक्षणानुसार ५९ टक्के लोकांना सध्या पंतप्रधानपदासाठी सर्वात सक्षम चेहरा हा नरेंद्र मोदी यांचा वाटत आहे. या यादीमध्ये नरेंद्र मोदी यांच्यानंतर लोकांनी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदासाठी योग्य चेहरा मानले आहे. २१ टक्के लोकांना वाटत आहे की राहुल गांधी सक्षम आहेत. ९ टक्के लोकांच्या मते तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल हे पंतप्रधानपदासाठी सक्षम व्यक्ती आहेत. देशातील २१ प्रमुख राज्यांमधील लोकसभा मतदारसंघांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.