लोकल सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा, परंतु अजूनही तिकीटाची परवानगी नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलाच संतापला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात तिकीट नाकारत असल्यामुळे उपयोग काय लोकलचा असा प्रश्न आता विचारला जात आहे. लोकल तिकीट नसल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल खूप होताहेत. तिकीटासाठी महिनाभर पास काढावा लागल्यामुळे, सामान्यांच्या खिशाला चांगलाच भूर्दंड पडत आहे.
मुंबईकरांसाठी लोकल प्रवास हा केव्हाही वेळेची बचत होणारा असल्याकारणाने, सर्वसामान्य मुंबईकराची भिस्त ही लोकल प्रवासावर अधिक आहे. ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनच्या कामानिमित्त जाण्यासाठी महिन्यातून जेमतेम चार-सहा वेळा जावे लागते. मात्र तिकीट नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना यासाठी एका महिन्याचा पास काढावा लागत आहे. इतकेच नव्हेतर अनेक छोट्या व्यावसायिकांना मुंबईतील घाऊक बाजारातून सामग्री विकत घेण्यासाठी महिन्यातील काही दिवस प्रवास करावा लागतो. मात्र, त्यांना देखील एका महिन्यांच्या मासिक पास काढावा लागत आहे.
हे ही वाचा:
आता काँग्रेसशी चर्चेची वेळ निघून गेली
गांजा फुकून आरोप करताना थोडा अभ्यास करा
चीनच्या नव्या कुरापती, नदी प्रदूषित करण्याचा डाव
‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, पण मंत्री भेटायलाही जात नाहीत’
तर, अनेक व्यावसायिकांना महिन्यातील काही दिवसच मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बरवरून प्रवास करायचा असतो. परंतु, या सर्व मार्गिकेचा मासिक पास काढणे लसंवतांना परवडणारे नाही. कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लसवंतांचा लोकल प्रवास सुरु आहे. मात्र, या प्रवाशांना लोकलचे तिकीट मिळत नसल्याने मासिक पास काढून प्रवास करावा लागतोय. परंतु, ज्या प्रवाशांना महिन्यातून बोटावर मोजण्या इतक्याच दिवशी प्रवास करायचा असतो, त्यांना देखील मासिक पास काढून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता लसवंतांना लोकल तिकिट देण्याची मागणी जोर धरत आहे.