देशाच्या अर्थसंकल्पात १२ लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय हा देशातील मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे. याच मध्यमवर्गीयांनी देशाची सूत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात दिली. आज त्यांना दिलासा मिळाला आहे. देशाची आर्थिक प्रगती होत आहे, आणि हे केवळ नरेंद्र मोदीच करू शकतात अन्य कोणामध्ये दम नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केली.
आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सदर केल्यानंतर देवधर यांनी त्यावर आपले मत व्यक्त केले. देवधर म्हणाले, युएस डॉलरमध्ये बोलायचे झाले तर १४ हजार १०० इतके उत्पन्न करमुक्त झाले आहे. युएसएमध्ये त्यांनी तयार केलेल्या स्लाबनुसार १४ हजार ६०० डॉलर रक्कम ही करमुक्त आहे. आज युएसए असेल किंवा भारत असेल त्यासाठी मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला असल्यामुळे सगळा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देत आहे.
हेही वाचा..
देशाला आर्थिक महासत्ता, विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प!
आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा अर्थसंकल्प!
अर्थमंत्र्यांनी परिधान केलेल्या साडीतून झाला मधुबनी कलेचा सन्मान!
यंदाचा अर्थसंकल्प भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणार!
आज निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना मध्यमवर्गीयांना जो दिलासा दिला आहे त्यामुळे सगळा देश नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देत आहे. हेच ते मध्यमवर्गीय आहेत ज्यांनी सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांना भरभरून मतदान केले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत, असे सुनील देवधर यांनी म्हटले आहे.