भारतात फक्त प्रभू रामाच्याच परंपरा राहतील, बाबर-औरंगजेबच्या नाही!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य 

भारतात फक्त प्रभू रामाच्याच परंपरा राहतील, बाबर-औरंगजेबच्या नाही!

भारतात प्रभू राम, कृष्ण आणि बुद्ध यांच्या परंपरा कायम राहतील, बाबर आणि औरंगजेबच्या नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीम आणि अन्य जातींच्या सणांदरम्यान कोणतीही समस्या उभी होत नाही, त्यानुसार हिंदू सणांदरम्यान कोणी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करेल तर सरकारकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

यावेळी संभलमध्ये सापडलेल्या मुर्तींचाही त्यांनी उल्लेख केला. मुख्यमंत्री म्हणाले, न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे प्रशासनाचे काम आहे, यामध्ये सरकार त्यांना दिशा देवो अथवा ना देवो आदेशाचे पालन करेन ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि संभलमध्ये प्रशासनाने तेच केले आहे.

हे ही वाचा: 

‘पॅलेस्टाईन’नंतर ‘बांगलादेश’ची बॅग प्रियांका वाड्रांच्या खांद्यावर!

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांना पक्षातले लोक कंटाळले; अर्थमंत्र्यांचा राजीनामा

संभल येथे सापडलेल्या मंदिरामागील अनधिकृत बांधकाम पाडायला सुरुवात

अमेरिकेच्या शाळेत पुन्हा गोळीबार; दोन जण ठार

आज त्याठिकाणी सर्व काही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले, मी तुमच्या वाक्याशी सहमत आहे की तुम्ही मंदिराला त्रास दिला नाही, यावर तुम्ही खूप उपकार केलेत. परंतु, २२ विहिरी आणि त्यातून मिळणाऱ्या मूर्ती या विहीर कोणी बंद केल्या?, नोटीसमुळे अडचण का होत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

समाजवादी पार्टीचे नेते शफिकुर रहमान बर्क यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगी म्हणाले, शफिकुर रहमान बर्क यांनी  भारताचा नागरीक आहे असे कधीही म्हटले नाही, ते म्हणायचे मी बाबरचा मुलगा आहे. विरोधकांवर बोट करत म्हणाले, आक्रमणकर्त्यांना आपला आदर्श मानायचे कि प्रभू राम, कृष्ण आणि बुद्ध यांना आदर्श मानायचे हे आता तुम्हाला ठरवायचे आहे. भारतात प्रभू राम, कृष्ण आणि बुद्ध यांचीची परंपरा राहतील, बाबर आणि औरंगजेबची परंपरा राहणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Exit mobile version