एका प्लास्टिक पिशवीटे विघटन होण्यासाठी शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो. आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या सिंगल युज प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. असे म्हणतात, या पृथ्वीवर एवढे प्लास्टिक जमा आहे की पृथ्वीला सहज तीन ते चार वेळा सहज गुंडाळू शकतो. यावरून हे प्रकरण किती भयंकर आणि काळजीचे आहे, याचा अंदाज येतो. प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक पिशव्या जाऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळेच भारताने प्लास्टिक वापरावर निर्बंध आणले.
प्लास्टिकला पर्याय म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सिंगल युज प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचे त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय येथे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनात वेगवेगळ्या वस्तू आपले लक्ष वेधून घेत होते. त्यात प्रामुख्याने फुट्याचे टेबल, खुर्च्यांचे सेट, पिओपीला पर्याय म्हणून शाडूच्या मूर्ती, कापडी पिशव्या, कागदी भांडी, मिठाई बॉक्स, प्लेट्स, लाकडी झाडाच्या आकर्षक कुंड्या, कागदी लॅपटॉप टेबल, कागदी मकर, लाकडी फणी, बांबूचे दागिने असे असंख्य प्रकारचे स्ट़ॉल या प्रदर्शात भरलेले होते. ग्राहकांनी या प्रदर्शाला भरभरून प्रतिसाद देऊन वस्तूही खरेदी केल्या.
यात प्रामुख्याने पुण्याच्या मनिषा यांनी पुनरावर्तन नावाची एक मोहीम राबवली होती. त्यांचाही स्टॉल या प्रदर्शनात ग्राहकांचे लक्ष वेधून घेत होता. लोकांना शाडू मातीच्या गणपतीचे विसर्जन घरीच करून ती माती परत करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. अशी त्यांनी २३ हजार किलो माती गोळा करून ही माती त्यांनी मूर्तीकारांना परत केली. त्यातून आता नवीन गणपतीच्या मूर्त्या बनवल्या गेल्या आहेत. तीन वर्षे हा उपक्रम पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि ठाण्यामध्ये हा उपक्रम राबविला गेला. यावर्षी त्यांना मुंबईतही हा उपक्रम राबवायचा आहे, असे त्या म्हणाल्या.
या प्रदर्शनामध्ये कागदी देवालय सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हे देवालय छोट्याशा बॉक्समध्ये ओपन करून ठेवता येईल, अशी त्याची रचना केली होती. आपणाला हवे तेव्हा हे जोडून पुन्हा वापरात आणू शकता. याचा उपयोग गणपतीमध्ये डेकोरेटसाठीही याचा उपयोग होतो. परत फोल्ड करून दुसऱ्या वर्षीही हे वापरता येऊ शकते. याचा उपयोग तीन-चार वर्षे सहज होऊ शकेल असे हे प्रोडक्ट मजबूत आहे.
हे ही वाचा:
भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक
काँग्रेसने ७० वर्षात एकाच देशात दोन देश निर्माण करण्याचे काम केले
अतीक अहमद, अश्रफच्या हत्येचा बदला घेणार
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या भोजपुरी अभिनेत्रीचा पर्दाफाश
प्लास्टिकचा वापर तात्काळ बंद करण्याची तात्काळ गरज आहे. त्यासाठी प्लास्टिकचा वापर जास्तीत जास्त कसा टाळता यावा यासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकांमध्ये बदलही दिसताहेत. लोकांची प्लास्टिक मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या काहदी वस्तूंची पेपर प्लेट, डीशेस, मिठाई बॉक्स, पाऊच, इन्वलप, कागदी पिशव्याची मागणी वाढताना दिसत आहे. तुम्ही जेवढे प्लास्टिकचा कमी वापर कराल, तरच पुढील पिढी त्यांचे चांगलं आय़ुष्य जगू शकेल. प्लास्टिक पिशवीचा वापर बंद करा. कापडी पिशवीचा वापर करा, असा संदेश या प्रदर्शनातून मिळतोय.
याच्या वापरावर आहे बंदी
सजावटीसाठी प्लास्टिक, थर्मोकोल, मिठाई बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकिटे, प्लास्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, प्लास्टिकचे झेंडे, प्लास्टिकच्या आइस्क्रीम काड्या, प्लास्टिक प्लेट्स, कप, पेले, ग्लासेस, काटे, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, पिशव्या आदी.