‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूच काम करतील’

टीटीडी बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांचे वक्तव्य

‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूच काम करतील’

तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष बीआर नायडू यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भगवान व्यंकटेश्वराचे निवासस्थान असलेल्या तिरुपती मंदिरात काम करणारे सर्व लोक हिंदू असले पाहिजेत, असे अध्यक्ष बीआर नायडू म्हणाले आहेत. तर इतर धर्मातील कर्मचाऱ्यांचे काय करायचे याबाबत आंध्र प्रदेश सरकारशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, अशा कर्मचाऱ्यांना इतर विभागात पाठवले जाऊ शकते किंवा स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) दिली जाऊ शकते.

गुरुवारी (३१ ऑक्टोबर ) हैदराबादमध्ये पत्रकारांशी बोलताना बीआर नायडू म्हणाले, तिरुमलामध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू असली पाहिजे. या दिशेने काम करण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न असेल. यामध्ये अनेक मुद्दे आहेत. याचा आपण विचार केला पाहिजे, असे नायडू यांनी म्हटले. तसेच बोर्डाच्या अध्यक्षपदी निवडीमुळे स्वतःचे सौभाग्य असल्याचे म्हटले. यासाठी बीआर नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचे आभार मानले.

बीआर नायडू यांनी आरोप केला की, मागील वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात तिरुमलामध्ये अनेक अनियमितता झाली आहे. आता मंदिराचे पावित्र्य जपले पाहिजे. आपले कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने पार पाडणार असल्याचे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा :

१८ हिंदुंवर देशद्रोहाचा गुन्हा !

ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेतील हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन

मुस्लिम पुरुषाने हिंदू असल्याचे भासवून हिंदू महिलेशी केले लग्न

पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचे निधन

Exit mobile version