तिरुमाला मंदिरात केवळ हिंदूंनाच नोकरी द्यायला हवी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केले मत

तिरुमाला मंदिरात केवळ हिंदूंनाच नोकरी द्यायला हवी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवार, २१ मार्च रोजी महत्त्वाचे विधान केले. तिरुमाला मंदिरात केवळ हिंदूंनाच नोकरी दिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच जर इतर समुदायातील व्यक्ती सध्या तिथे काम करत असतील तर त्यांच्या भावना दुखावल्याशिवाय त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित केले जाईल, असा विश्वासही चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, तिरुमला मंदिरात फक्त हिंदूंनाच काम द्यावे. जर इतर समुदायातील व्यक्ती मंदिरात काम करत असतील तर त्यांच्या भावना दुखावल्याशिवाय त्यांना इतरत्र हलवले जाईल,” असे नायडू म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये व्यंकटेश्वर स्वामी मंदिरे बांधण्याची योजनाही जाहीर केली.

चंद्राबाबू नायडू यांनी सात पवित्र टेकड्यांपैकी एकाच्या पायथ्याशी असलेल्या मुमताज हॉटेल बांधण्याच्या वादावरही भाष्य केले. नायडू यांनी नमूद केले की या परिसराला लागून असलेल्या मुमताज हॉटेलसाठी यापूर्वी परवानगी देण्यात आली होती. तथापि, सरकारने आता ३५.३२ एकर जमिनीवर नियोजित असलेल्या हॉटेलची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा  : 

आयपीएल २०२५ : केकेआर आणि आरसीबीचा उद्घाटन सामना रद्द होणार?

विधारा: एक चमत्कारी औषध, अनेक आजारांवर प्रभावी

मायग्रेनपासून मुक्ती देणारे ‘स्वर्गीय झाड’

सेव्हन हिल्स क्षेत्राजवळील व्यावसायिक उपक्रमांबद्दल नायडू यांनी स्पष्ट केले की, यासाठी यापूर्वी परवानगी देण्यात आली होती. पण, सरकारने आता ३५.३२ एकर जमिनीवर नियोजित असलेल्या या हॉटेलची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सेव्हन हिल्सजवळ कोणतेही व्यावसायिकीकरण होऊ नये. हॉटेल व्यवस्थापनाने फक्त शाकाहारी जेवण देण्याचा प्रस्ताव दिला असला तरी, सरकारने स्पष्ट केले आहे की या परिसरात कोणत्याही खाजगी व्यक्तींना परवानगी दिली जाणार नाही.

दोन मिनिटांत सिद्ध होऊ शकते, आदित्य ठाकरेंचे निर्दोषत्त्व! | Dinesh Kanji | Aditya T | Disha Salian

Exit mobile version