नव वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक; मुंबईत पोलीस अलर्ट मोडवर

नागरिकांच्या उत्साहाला, आनंदाला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस सज्ज

नव वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक; मुंबईत पोलीस अलर्ट मोडवर

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज असताना दुसरीकडे मुंबई पोलिसही सुरक्षेसाठी सज्ज झाले आहेत. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासह इतर समुद्र किनारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. नागरिकांच्या उत्साहाला आणि आनंदाला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.

मुंबई पोलिसांकडून मुंबईत ठिकठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी समुद्रकिनारी देखील सुरक्षा वाढवली आहे. नवीन वर्ष संपूर्ण शहरात शांततेत साजरे व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी समुद्रकिनारी सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांनी १८ बोटी सागरी सीमेवर तैनात केल्या आहेत. या बोटींवर प्रत्येकी एक पोलीस अधिकारी आणि चार पोलीस हवालदार शस्त्रांसह असणार आहेत. ३१ डिसेंबरच्या सकाळपासून १ जानेवारीच्या सकाळपर्यंत अशी २४ तास पोलीस फौज तैनात असणार आहे.

गेटवे ऑफ इंडिया- ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, वांद्रे ताज लँड, जुहू चौपाटी, अक्सा बीच, ट्रॉम्बे माहुल जेट्टी, भाऊचा धक्का आदी महत्त्वाच्या ठिकाणांवर नौका तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच लोकांनी मजेच्या नादात समुद्रात जाऊ नये यासाठीही पोलीस विशेष लक्ष देणार आहेत.

मुंबईत पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी, बंदोबस्त करण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या आणि हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. त्याशिवाय, पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट राबविले आहे. पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये काही जणांना ताब्यात घेतले असून अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करून ७७ जणांना अटक केली आहे. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या ४९ कारवाया करण्यात आलेल्या असून त्यात चाकू तलवारी शस्त्रे जप्त करण्यात आलेले आहेत.

हे ही वाचा:

दहशतवादी हाफिज सईदच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान सरसावले!

नौदल अधिकाऱ्यांच्या वर्दीवर शिवमुद्रा; नवे स्कंधचिन्ह जाहीर!

‘इस्रायल-हमासचे युद्ध पंतप्रधान मोदीच थांबवू शकतात’

उत्तर मेक्सिकोमध्ये पार्टीत बंदुकधाऱ्यांच्या हल्ल्यात सहा ठार

नव वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशातच नववर्षाच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी आणि वाहतूक पोलिसांनी मुंबईतील गिरगाव, जुहू चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये वाहतुकीत आणि पार्किंगच्या व्यवस्थेत काही बदल केलेले आहेत.

Exit mobile version